वर्ध्यात व्हाईट कॉलर गुन्हेगारीला ‘खाकी’ चं बळ

By साहसिक न्यूज 24
वर्धा / प्रमोद पानबुडे :
राजकीय आश्रय , वर्चस्वासाठी गावगुंडाची फौज अन् काळ्याधंद्यातील मिळकतीमूळे टोळ्यांनी शहर व ग्रामीण भागात दहशतीचे साम्राज्य निर्माण केले आहे. कायद्याचा धाक झुगारलेल्या ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारीला वर्धा शहर ठाण्यातील काही अधिकारी व जिल्ह्यातील अन्य काही पोलिस ठाण्यातील झारीतील शुक्राचार्याकडून बळ मिळू लागल्याने शहरात व परीसरात अशांत टापू बनू लागला आहे. ‘व्हाईट कॉलर’ म्हणणारे आता काळे धंदेवाल्यासोबत हातमिळवणी केल्यामुळे परिसरातील ‘कॉमन मॅन’ भीतीच्या छायेखाली वावरतो आहे.
नंग्या तलवारी , चाकू , हॉकी स्टिक्ससह धारदार शस्त्राने भर चौकात होणाऱ्या हल्ल्याच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत. अगदी क्षुल्लक करणातूनही इथे तलवारी फिरवल्या जात आहेत. आता तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच या व्हाईट कॉलर ने गावगुंडांना हाताशी धरून वार करण्यास सुरवात केली आहे. अश्या टोळ्यांना कायद्याचा धाक नसल्यामुळे काही संघटीत टोळ्यांच्या म्होरक्यासह साथीदारांनी दहशतीचे साम्राज्य निर्माण केले आहे. अलिकडच्या काळात वर्धा ते पवणार रोडवर पत्रकारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भीती आणि चिंतेचे सावट असतानाच राजकीय वर्चस्वातून स्टेशन फैल परिसरात पुनः जोरदार राडा झाला. यामध्ये एका गटातील नेल्सन नामक युवकाच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून त्याला अर्धमेला केला. यामध्ये दुसऱ्या गटातील गावगुंडांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय आश्रयाने सोकावलेल्या टोळक्याने परीसरात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. परीसरात घडणाऱ्या लहान मोट्या गुन्ह्यातइल संशहितांना पाठीशी घालून पोलिस कारवाई पासून वाचविण्यासाठी टोळीचा सतत आटापिटा सुरू असतो. फिर्यादी पोलिस ठाण्यात दाखल होण्यापूर्वीच म्होरक्यांची सवारी पोलिस ठाण्याच्या दरात पोहचलेली असते. मग कशी होईल वर्ध्यातील गुन्हेगारी कमी ! गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख रेकॉर्डवरील गुन्हेगार जामिनावर किंवा निर्दोष सुटल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात टोळ्यांचा विस्तार वाढवत आहे. परीसरात गुन्हेगाराचे वाढते प्रस्त प्रकर्षाने जाणवू लागले आहे. गुन्हेगारी टोळ्या असया पद्धतीने दहशत निर्माण करीत असताना पोलिसांसमोर खाकी वर्दीचा धाक निर्माण करण्याचे आव्हान कायम आहे. वर्धा शांत व सुरक्षित शहर अशी ओळख होती. मात्र शहर आणि परिसराचा विकास वेगाने झाला. त्याचप्रमाणे गुन्हेगारी देखील तितक्याच गतीने वाढली. एकमेकांचे मुळदे पाडण्यापासून टोळ्यांचे सुडसत्र याचा रक्तरंजित इतिहास शहरवासीय अनुभवत आहेत. गेल्या काही वर्षात काही गावगुंडांवर मोकासारखी कारवाई करण्यात आली. मात्र गुन्हेगारांचे खाकीला आव्हान कायम आहे. पुनः गुन्हेगारी खून,हल्ला,हाणामारी, आदींच्या मध्यमांतून दहशतीचे सत्र कायम ठेवले आहे.
स्टेटसवरुण गुन्ह्याचे संकेत
दुसऱ्या वादळाची तयारी सुरू.. लवकरच निकाल.. यासह विविध खुनशी स्टेट्स , विडियो सोशल मिडियावर व्हायरल करून एकमेकांना खुन्नस देण्याचे प्रकारही वाढू लागले आहे. पिस्तूल तलवारीसह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनकडून कारवाई करण्यात आल्या आहेत .