वर्ध्यात सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे २७ प्रवाशाचे प्राण वाचले

0


साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्धा बसस्थानकात एसटी बसने प्रवेश करत असताना , बसच्या मागील चाकातून धूर निघत असल्याचे कर्तव्यावर हजर असलेले सुरक्षा रक्षक पवण बावनकर यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्या सोबत असलेला सहकारी किसना आबंटकर यांनी बस चालकास आवाज देऊन वस थाबविली व आग लागल्याची माहिती दिली. तसेच सर्व प्रवाशांना खाली उतरविले. गाडीत असलेला अग्निशामक सिलेंडर आग विझवली. यामध्ये कोणत्याही प्रवाशांना कुठलंही दुखापत झाली नसुन सर्व प्रवाशी सुखरूप एस टी बसच्या बाहेर पडले. हि आग बसच्या ब्रेक लायनरमध्ये बिघाड झाल्याने लोखंडी ड्रमचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने आग लागून धूर निघत असल्याचा प्राथमिक अंदाज परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेळीच सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!