वर्ध्यात ४० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी सहाय्यक नगररचनाकारवर गुन्हा दाखल

0

Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा:
पोद्दार ले-आऊट सेवाग्राम येथील सहा रो-हाउसचे झालेल्या बांधकामाचे 30 हजार तसेच सध्याचे संस्कार स्कूल बरबडीचे बांधकाम नकाशा मंजुरीकरीता 35 हजार रुपयाची मागणी सहाय्यक नगररचनाकाराने फिर्यादीस मागितली होती. यात तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, फिर्यादीस ही रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्धा शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कुणाल मोरेशिया असे अटक करण्यात आलेल्या सहा. नगररचनाकाराचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवार 1 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. पोद्दार ले-आउट सेवाग्राम येथील सहा रो-हाउसच्या झालेल्या बांधकामाचे 30 हजार रुपये तसेच संस्कार स्कूल बरबडीचे बांधकाम नकाशा मंजुरीकरीता 35 हजार अशी 65 हजारांची फिर्यादीला लाच मागितली होती. मात्र, फिर्यादीने 40 हजार रुपये देण्याचे कबूल केले. यावर सहा. नगररचनाकाराने 40 हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. मात्र, फिर्यादीला पैसे द्यायचे नसल्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लाच मागण्यात आल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, सहा. नगररचनाकार कुणाल मोरेशिया यांच्या विरोधात वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते तसेच सचिन मत्ते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डि. सी. खंडेराव, पोलिस निरीक्षक संदिप थडवे, सहाय्यक फौजदार रवींद्र बावणेर, संतोष बावणकळे, सागर भोसले, अपर्णा गिरजापुरे, कैलास वालदे, प्रदिप कचनकर, प्रशांत मानमोडे, प्रितम इंगळे, मनिष मसराम, निलेश महाजन आदींनी केली.
………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!