वादळी वाऱ्यासह पाऊस, घरांची पडझड , रात्र काढावी लागली काळोखात

0

By साहसिक न्युज 24
गजेंद्र डोंगरे/ मदनी(आमगाव) :
परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात जंगली आमगाव येथे घरांचे पत्रे उडाले.भिंती खचल्या गेल्या यात ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले.वादळ वारा प्रचंड वेगात असल्याने झाडाच्या फांद्या तोडून खाली कोसळल्या व विजेच्या तारा तुटल्या,घरावरील पत्रे दूरवर जाऊन कोसळले होते. वीजपुरवठा खंडित झाला असून महावितणतर्फे कोणीच कर्मचारी आले नसल्यामुळे विद्युत पुरवठा सुरू होऊ शकला नाही.त्यामुळे नागरिकांना रात्र काळोखात काढावी लागली.विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला .
वादळात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. वादळी वाऱ्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने येथील कुटुंब उघड्यावर आले.सध्या शेतीची कामं सुरू असून बी बियाण्याची वेवस्था करणे सुरू आहे.अशातच हा खर्च वेगळा.नुकसानग्रस्त ग्रामस्थांवर संकटांचे आभाळच कोसळले असून संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे.कुटुंब जगवावे कसे, असा प्रश्न पडला आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सरपंच श्रीराम यांनी तातडीने नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून गोरगरिबांना शासना कडून मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!