वाळू वाहतूक प्रकरण : तलाठ्यावर दादागिरी करणाऱ्या “त्या” डॉनला अटक!

0

 

By साहसिक न्युज 24

मुक्ताईनगर /पंकज तायडे :

तलाठ्यावर दादागिरी करून वाळू वाहतूक प्रकरणात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यानंतर पसार झालेल्या डॉनच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. संशयीताला अधिक कारवाईसाठी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोकूळ उर्फ डॉन रघुनाथ कोळी (रा. भोलाणे, ता. जळगाव) असे अटक केलेल्या संशयीताच नाव आहे. गोकूळ कोळी हा अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळला होता. त्यावेळी त्याने तलाठी यांच्याशी हुज्जत घातली.

होती. २०२० मध्ये ही घटना घडली व त्यानंतर संशयीत पसार झाला होता. त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतूकीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गोकूळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना मिळून येत नव्हता. गोकूळ उर्फ डॉन याला पकडण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतंत्र पथक नेमले होते. गोकूळ हा भोलाणे गावात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने त्याचा शोध घेतला. त्यानंतर बांभोरी गावातही पथकाने शोधकार्य सुरू केले. शेवटी तो जैनाबाद येथील नातेवाईकांकडे आल्याची माहिती मंगळवारी सकाळी एलसीबीला मिळाली. पथकाने लागलीच जैनाबाद गाठून गोकूळ याच्या मुसक्या आवळल्या.

यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश, महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राजेंद्र पवार यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!