विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर आमदार डॉ. रामदास आंबटकर यांची नियुक्ती
साहसिक न्यूज 24 / वर्धा :
महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ, नागूपर या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून आमदार डॉ. रामदास आंबटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्याबबात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कक्ष अधीकारी मंदार शेमणकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
आमदार आंबटकर हे उच्च विद्याविभूषीत असून, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या तीन जिल्ह्यात त्यांनी गेल्या काही वर्षांत अनेक प्रश्न व विकासकामे मार्गी लावली आहेत. आमदार डॉ. आंबटकर यांची सदस्यपदी 20 एप्रिल 2022 रोजी नियुक्ती केली असून, 21 जून 2024 पर्यंत सदस्यत्वाची मुदत आहे. निवडीबद्दल आमदार डॉ. आंबटकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.