विद्यार्थी प्रवासी मित्र संघटना तर्फे दिले स्मरण पत्र,निवेदन. त्वरित बस सुरू करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू

0

वर्धा, तुळजापूर-वघाळा -/ वाहतूक विभागीय अधिकारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवाग्राम ,वर्धा. गोविंद उजवणे यांना दहेगाव गोसावी ला बस सेवा त्वरित सुरू करा विद्यार्थी प्रवासी मित्र संघटनेतर्फे स्मरण पत्र निवेदन दिल्या गेले.सर्व विद्यार्थी कॉलेज व शाळेला न जाता सेवाग्राम रेल्वे स्टेशनला उतरून पायदळ म.रा.प.म. आगर औद्योगिक परिसर कार्या. सेवाग्राम, वर्धा रोडला कमीत कमी चार किलोमीटर पायदळ आले.आगर ऑफिसला येता येता सर्व विद्यार्थी थकुन गेली होती परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती असलेली तळमळता व जिद्द व आगर विभागाची असलेली कुंभकरण झोप उडवण्याकरिता आज विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता पायपिटा केला.
गांधी जिल्ह्यामध्ये अहिंसा चा पाठ पढवणारे महात्मा गांधीजी यांच्या धोरणाला पकडून अहिंसावादी परंपरेला धरून पायदळ सेवाग्राम रेल्वे स्टेशन वरून आगर परिसर सेवाग्राम विभागीय कार्यालयामध्ये पोहोचले.
सर्व विद्यार्थी चिडून होते तुम्ही काही करा पण बस सुरू करा आमची शाळा कॉलेजचे बुडत असून आमची आता परीक्षा सुरू होणार आहे .
सर्वांनी प्रश्न केला जपान सारख्या देशांमध्ये एका विद्यार्थ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू होऊ शकते तर एवढ्या विद्यार्थ्यांसाठी दहेगाव गोसावी ला बस सेवा का सुरू करत नाही.
दहेगाव गोसावी करिता आम्हाला जास्त नको सकाळची फेरी आणि संध्याकाळची हाल्टिंग द्या एवढेच मागणं विद्यार्थ्यांचे आणि पालक लोकांचं आहे .
उलट बस सुरू झाल्यास खाजगी वाहतुकीस आळा बसेल व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नात भर सुद्धा पडेल आणि विद्यार्थ्यांना सेवा मिळेल .
आजचे विद्यार्थी उद्या देशाचे भविष्य आहे हे आज तळमळीने उजवने साहेब यांना सांगण्यात आले
2023 पासून सतत निवेदन आगर विभाग सेवाग्राम ला दिले जात आहे.
स्मरण करून दिला जात आहे की दहेगाव गोसावी ला सकाळची रेल्वे व्यवस्था नसल्याने कारणामुळे विद्यार्थी मित्र यांचे शैक्षणिक भविष्य खराब होत आहे त्यामुळे सकाळची एक तरी फेरी दहेगाव गोसावी करिता करा म्हणून संघटनेतर्फे वारंवार निवेदन दिले जात आहे.
तसेच आमदार समीर भाऊ कुणावार यांचे अति महत्त्वाचे पत्र व ग्रा.प.दहेगाव गोसावीचा ठराव दिला तरी आगर विभाग सुस्त.
त्वरित बस सेवा सुरू करू असे आश्वासन दिले नेहमीच प्रमाणे आश्वासन देऊन विद्यार्थी व पालक यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम आगर विभाग करत असल्या कारणामुळे आज प्रवासी विद्यार्थी मित्र संघटना व पालक यांनी तटस्थ भूमिका घेऊन वाहतूक विभागीय अधिकारी उजवणे यांना ताकीद दिली की तुम्ही जर उद्याला बस जर आली नाही तर परवा आम्ही वर्धा नागपूर हायवे रोडला चक्काजाम करू याला सर्वस्वी जबाबदार आगर विभाग राहतील.
यावर वाहतूक विभागीय अधिकारी उजवने साहेब म्हणाले तुम्हाला आंदोलन करण्याची गरज राहणार नाही असे आज त्यांनी अस्वस्थ केले.
त्वरित त्यांनी वाहतूक व्यवस्था करणाऱ्या अधिकाराला फोन ध्वनी लावून उद्या कोणत्याही परिस्थितीत मध्ये दहेगाव गोसावी ला बस सुरू करा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर निकालात लावा असं सर्व शिष्ठ मंडळाला आश्वासन दिले.
निवेदन देताना रामकिशोर रामाजी शिगनधुपे,वैशाली उईके कल्याणी पामरे पूजा खुरपडे यामिनी निस्ताने समीक्षा चौधरी समृद्धी वाटकर मयुरी बाहे काजल आंबाडोळे काजल आचरकाटे प्राजक्ता नेहारे संजना राणा संजीवनी आंबाडोळे रूतिक धंदरे तुषार कोल्हे शुभम बाईलबोडे आदी. आणि सर्वांनी साहेबाचे धन्यवाद मानले.

गजानन जिकार साहसिक NEWS-/24 तुळजापूर वघाळा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!