विश्ववारकरी सेना वर्धा जिल्हा कडून कार्यकारणीची नवनियुक्ती
विश्व वारकरी सेना वर्धा जिल्हा तसेच सयाजी महाराज पंचमुखी हनुमान देवस्थान येथे श्री. ह. भ. प. मयूर महाराज यांच्या अध्यक्षतेत विश्व वारकरी सेना वर्धा जिल्हा यांचे कडून श्री. राजूभाऊ भोयर यांची सेलू तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करून पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. तसेच सौ. सरला प्रमोद चापडे यांची शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन उपाध्यक्ष वर्धा जिल्हा पदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील तसेच सेलू तालुक्यातील विश्व वारकरी सेना , पदाधिकारी व साप्रदायांकडून पुढील वाटचाली करिता पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी मान्यवर अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच ह .भ. प. मयूर महाराज यांनी मार्गदर्शन देऊन वारकरी सांप्रदाया बाबत माहिती दिली. वारकरी संप्रदायाचे कार्य महान असून प्रत्येकाच्या मनात भक्तीभाव जागृत करून खऱ्या अर्थाने माणूस घडवण्याचे काम संतांनी केले संतांच्या कार्याला नवीन पिढीतील तरुण, बालक यांनी या मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी ह.भ.प. मयूर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली वारकरी सेनेतील नवनियुक्त अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांना पुढील वाटचाली करिता पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजन हभप सयाजी महाराज पंचमुखी हनुमान देवस्थान येळाकेळी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी भक्त मंडळी उपस्थित होते. तसेच ह भ प मयूर महाराज यांच्या कडून सहासिक न्यूज 24 चे पत्रकार गजेंद्र डोंगरे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला यशस्वीतेकरीता ज्ञानेश्वर हिवसे, प्रकाश खंडार, मंजुषा काळे, संगिता बेले, सरला चापडे, राजूभाऊ भोयर, विठ्ठल घुमे, ज्ञानेश्वर येलोरे, शंकर निखाडे, दत्तात्रय येवले, भगवान इवनाथे, अनिल धोंगडे तसेच विश्ववारकरी सेना, वर्धा जिल्ह्यातील मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन सौ सरला चापडे यांनी केले
गजेंद्र डोंगरे सहासीक न्यूज 24 सेलू