वोडाफोन- आयडियाचे नेटवर्कमधील बिघाडामुळे मोबाईलग्राहक त्रस्त..

0


हिंगणघाट : मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे हिंगणघाट शहर व परिसरातील वोडाफोन तसेच आयडिया मोबाईल ग्राहकांना गेल्या चार दिवसापासून मोठा मनस्ताप होत आहे.
कधी कॉल ड्रॉप होत आहे तर डेटा काम करीत नसल्यामुळे मोबाईल धारकांना व्हाट्सअप व इतर सोशल मीडिया उपयोग करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अनेक मोबाईल धारक विशेषतः वोडाफोन आयडिया चे सिम कार्ड वापरणारे ग्राहक गेल्या चार दिवसात त्रस्त झाल्यामुळे शहरातील वोडाफोन ऑफिसच्या चक्कर लावत आहेत. आज काही पत्रकारांनाही याचा फटका बसल्यामुळे त्यांनी सुद्धा वोडाफोन आयडिया स्थानिक कार्यालयात विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
कार्यालयात जाऊन तक्रार केल्यानंतर काही पत्रकारांनी बातमी प्रकाशित करण्याच्या भीतीमुळे ही वार्ता त्यांच्या पुण्याच्या कार्यालयापर्यंत जाऊन धडकली, वोडाफोनच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी बातमी न प्रकाशित करण्याची ही पत्रकारांना गळ घातली.
वोडाफोन आयडिया चे नेटवर्क नसल्यामुळे पत्रकारांसह अनेकांना याचा फटका बसला, काही तांत्रिक कारणामुळे वोडाफोन आयडिया नेटवर्क काम करीत नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले यानंतर ग्राहकांना मोबदला म्हणून ४ दिवस पर्यंत डेटा तसेच कॉल सुविधाची तारीख वाढवून देण्याची मागणी केली, परंतु कंपनीचे प्रतिनिधी किंवा स्थानिक कर्मचारी याबद्दल बोलायला तयार नाही.
‌ या चार दिवसाचे कालावधीत शहरातील तसेच काही ग्रामीण भागातील ग्राहकांनी आपले सिम कार्ड बदलून दुसऱ्या कंपनीला पोर्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, परंतु आता कंपनीचे प्रतिनिधी तसेच स्थानिक कर्मचारी त्यांना असे न करण्याची विनंती करीत आहे, परंतु कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना जो नाहक मनस्ताप झाला त्याची नुकसान भरपाई कशाप्रकारे करणार याबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही.
ग्राहकांच्या थोड्याशा चुकीमुळे आर्थिक लूट करणाऱ्या मोबाईल कंपन्यांना कोण धडा शिकविणार याबद्दल ग्राहक सांशक असून आता ग्राहकांनीच पुढाकार घेऊन कोट्यावधी रुपये कमविणाऱ्या मोबाईल कंपन्यांना धडा देणे आवश्यक झाले आहे.

ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!