व्हॉईस ऑफ मीडियाचा मंगळवारी पत्रकार दिन सोहळा पत्रकारांसाठी कार्यशाळाही आयोजित.
सिंदी (रेल्वे) : वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नालवाडी येथील देशमुख सेलिब्रेशनमध्ये मंगळवार ता.२३ रोजी पत्रकार दिन सोहळ्यासह पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी पत्रकारिता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारांना सन्मानित केले जाणार असून आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे व्हॉईस ऑफ मीडियाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्घाटक म्हणून दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे तर आकर्षणाचे केंद्रबिंदू पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामदासजी तडस, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, न्युज-१८ लोकमतचे ब्युरो चीफ प्रशांत लिला रामदास, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य संघटक सुनिल कुहीकर उपस्थित राहणार असून जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, राज्य उपाध्यक्ष प्रकाश कथले, आनंद आंबेकर, विदर्भ पालक सचिव संजय पडोळे, विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, प्रमोद राऊत, व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष वरुण पांडे, सरचिटणीस अनुपकुमार भार्गव प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.यावेळी ज्येष्ठ पत्रकार हरीभाऊ वझुरकर, समाजसेवक महेश गुल्हाणे यासोबतच पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस दलासाठी सेवा देणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांचा तसेच जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारांना देखील सन्मानित केले जाणार आहे. दुपारच्या सत्रात पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आल्याचे व्हॉईस ऑफ मीडियाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे