शब्द पुर्तीचा भूमिपूजन सोहळा संपन्न.
सिंदी (रेल्वे) : भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशच्या शाखा मंगरुळ ता. समुद्रपुर जि. वर्धा येथे महर्षी वाल्मिकी मंदिर परिसरात भव्य समाज मंदिर उभारण्यासाठी हिंगणघाट येथील कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांनी महर्षी वाल्मिकी मंदिर व समाज भवनाच्या निर्मिती करीता अक्षरी रुपये वीस लक्ष रुपयांचा निधी जाहीर केला होता. आनंदाची बाब म्हणजे अशी की, अगदी काही महिन्यातच तो निधी मंजूर करून, १८ ऑक्टोंबर रोजी मंगरुळ येथे अनेक मान्यवर मंडळी व भोई समाज बांधवांच्या उपस्थितीत समाज भवनाच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला.प्रसंगी उदघाटक म्हणून हिंगणघाटचे विद्यमान आमदार समीर कुणावार तसेच मुख्य अतिथी म्हणून भोई समाज क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोणारे तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी भोई समाज क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष राहुल हरसुले हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीत अमोल बावणे, मितेश हरसुले, पंकज बावणे, राकेश मोहीजे, गजानन इशंकर, प्रशांत कोल्हे, विनोद दाते, शरद करलुके, रमेश शेंडे, शरद मांढरे, भास्कर परिसे सरपंच पोटी, शारिका पोइनकर, वैशाली मेश्राम भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्य, अमोल गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे श्रोते मंडळी, मंगरूळ गावातील भोई समाज बांधव तसेच गावकरी मंडळी, तसेच वर्धा जिल्ह्यातील क्रांती दलाचे अनेक शाखांचे पदाधिकारी व सदस्य व आजु बाजुच्या गावावरुन आवर्जून उपस्थित असलेले समाज बांधव. तसेच महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.सदर कार्यक्रमात गावातील लहान मुलींनाही सुंदर साड्या व लुगडी नेसून नाचत बागडत सर्व पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच आमदार यांच्याहस्ते भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल समुद्र्पुर अध्यक्ष पदी गजानन इशनकर, सिंदी रेल्वे शहर अध्यक्ष प्रशांत कोल्हे, मंगरूळ सर्कल प्रमुख विलास मेश्राम, जम सर्कल प्रमुख देविदास मेश्राम तर काही महिलांच्या याच कार्यक्रमात भाजपा मच्छीमार सेलच्या नियुक्त्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशोर चांदुरकर तर आभार प्रदर्शनानंतर स्नेह भोजनाच्या मेजवानी नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगरुळ गावातील संपूर्ण समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज – 24 सिंदी रेल्वे