शहीद भुमितील ३००”वर्ष जुने राममंदिर..
अयोध्येला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेला अनुसरून येथील पुरातन राम मंदिर विद्युत रोषणाई अन् रामनामाने न्हाऊन निघाला शहरासह परिसर.
आष्टी(शहीद): अयोध्येत श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहरातील खरपा पासून बनविलेले पुरातन श्रीराम मंदिरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.तब्ब्ल तीनशे वर्षापासून हे मंदिर आष्टीकरांचे श्रद्धास्थान आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे भाविकांत चैतन्य पसरले आहे.या जुन्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली आहे.चैत्रशुद्ध नवमी अर्थातच श्रीराम नवमीला दुपारी बारा वाजता या पुरातन मंदिरात श्रीराम जन्म मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.आष्टी शहराच्या मध्य स्थानी असलेले पुरातन श्रीराम मंदिरात राम जन्मसोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.या सोहळ्यासाठी मनोभावे रामभक्त आनंदाची पखरण करतात.रामभक्त भजनात तल्लीन होऊन जातात.मंदिरामध्ये दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदीर सुद्धा अतिशय पूर्वीपासून स्थानापन्न आहे. त्याचप्रमाणे श्री राधा-कृष्णाचे, श्री दत्त महाराजांचे व महादेव मुर्ती स्थापन करण्यात आली आहे.स्थानिक मध्यभागी ३०० वर्ष जुने श्रीराम मंदिर आजही नागरिकांच्या आस्थेचे केंद्र बनले आहे .विशेष म्हणजे पुरातन काळापासून स्थापन केलेल्या प्रभू श्रीराम,माता सीता,आणि लक्ष्मणच्या सुबक आकर्षक मूर्ती आजही या मंदिराचा दैदिप्यमान इतिहास सांगण्यास पुरेसा आहे.त्याचप्रमाणे मंदिर आणि मज्जित यामध्ये फक्त एकच भिंत आहे.
सजावट, पूजन, होमहवनाचे आयोजन.
२२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामप्रभुंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असल्याने त्या पार्श्वभूमीवर आष्टीत सुद्धा राम मंदिर उत्सव समितीच्या वतीने मोठेराम मंदिरात रोषणाई, मंदिर सजावट, पूजा, शंखनाद ,दीपप्रज्वलन, होम हवन प्रसाद वाटप, फटाक्यांची आतिषबाजी , वेशभूषा, जगराता करण्यात येणार आहे. दर्शनाच्यावेळी गर्दीहोणार नाही याकरिता राम मंदिर उत्सव समितीच्या वतीने व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ट्रस्ट चे सचिव नीरज भार्गव यांनी सांगितले आहे.
मंदिराच्या विकासाची प्रतीक्षा.
आष्टी तालुक्यातील अनेक मंदिराचा कायापालट झाला आहे . मात्र हे राममंदिर आजही विकासापासून कोसो दूर आहे . इतर मंदिराप्रमाने श्री राम मंदिराचा ही विकास व्हावा अशी अपेक्षा भाविकांकडून होत आहे .
नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 शहीद आष्टी