शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीच्या महिलांनी मानले स्थानिक प्रतिनिधी आणि पत्रकारांचे चे आभार.

0

हिंगणघाट : वर्धा जिल्ह्या करीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समिती चा संघर्ष २०७ दिवस बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलन सतत सुरू होते।विविध घटकांनी शहरात शासकीय मेडिकल कॉलेज यावे ह्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामधे प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते श्री जयंत पाटील व आमदार समिरभाऊ कुणावर ह्यांनी विधान सभेत प्रशांमंदला होता त्यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेज चे ठिकाण निश्चित करण्यास समिती तयार केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ ह्यांची भेट अशा वेगवेगळ्या घटना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये होण्यास अनुकूल घडल्या होत्या.त्यामधे अन्नत्याग सत्याग्रह ,लोटांगण पालकमंत्री आश्र्वासन घेण्यात आले होते. तसेच वेगवेगळया सामाजिक संस्था तसेच राजकीय पुढारी पुढे येऊन वैद्यकीय शासकीय कॉलेज साठी आंदोलन करताना दिसत होते. स्वतः माननीय आमदार समीर कुणावर हे अधिवेशन चे दरम्यान नागपूर येते स्वतः पायरीवर आंदोलन केले ; महीला कृती समिती चे शासकीय वैद्यकीय महविद्यालयसाठी असलेले सर्व प्रयत्नांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहायोगच त्यांनी सदैव दर्शवला. आज विधान भवनात ना. मा. देवेंद्र फडणवीस ह्यांनी श्री जयंत पाटील नामदार समीर कुणावर ह्यांच्या उपस्थितीत शासकिय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे होणे तांत्रिकदृष्ट्या होणे जास्त सोयीस्कर आहे असे संबोधत हिंगणघाट येथे च वैद्यकिय महाविद्यालयं होईल ह्यावर शिक्कामोर्तब केले. त्याप्रत्यार्थ सावित्रीच्या लेकी ह्या सामजिक संस्थेमार्फत समितभाऊ कुणावर ह्यांचे अभिनंदन सीमा मेश्राम ह्यांनी केले ;तसेच सर्व पत्रकार बांधव ह्यांचे शाल आणि श्रोफळ देऊन अभिनादस्पर धन्यवाद व्यक्त करण्यात आले.प्रसंगी आमदार ह्यांनी आपल्या महाविद्यालयं मिळवण्याचा संघर्षांची वाटचाल विषद केली.त्यांनी हे कॉलेज सर्व प्रस्तावित महाविद्यालयपैकी सर्वात प्रभावी कॉलेज बनवण्यात येईल आणि त्त्याकरिता तसे परिश्रम ते स्वतः घेणार ह्याची खत्री सर्वांसमोर त्यांनी केली.कुणावार ह्यांनी महिलांचे मनापासून अभिंनंदन केले आणि महिलांच्या दीर्घ मेहनतीचे कौतुक केले. ह्या प्रसंगी सवित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट कडून राजश्री बांबोळे, सिंधू दखणे, निर्मला भोंगाडे, वंदना थूल, नंदिनी मांडवे, भारती वैद्य, मीरा फुलमाळी, सुचिता कांबळे, जया पोथारे, प्रतिमा तेलंग, ऋतू कांबळे, अमिता ढवळे, रजनी कांबळे, भाग्यश्री नगराळे, लीला थूल, प्रमोदिनी नगराळे, शारदा डोळे, सुषमा पाटील, तेजस्विनी पाटील, लीना नगराळे, ज्योत्सना म्हैसकर, गजभिये, लीला थूल, अर्चना गेडाम,वैशाली लोखंडे, लता साखरकर, रेखा बुरुड,रंजना चौधरी, ज्योत्स्ना कांबळे ,रेखा थुल, बुटले ताई ,मोना पाटील , वैशाली वागदे ,व सावित्रीच्या लेकी चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व सदस्या आणि इतर सर्व महिलांनी सर्व पदाधिकारी, पत्रकार ,स्थानिक प्रतिनिधी , ना फडणवीस तसेच जयंत पाटील ह्यांचे मनःपूर्वक आभार मानले पत्रकार पैकी वरिष्ठ पत्रकार भाष्कर कलोडे,रमेश लोंढे,विजय राठी,राजेंद्र राठी ,सोनू आर्या,सय्यद झाकीर,रवी येनूरकर,राजेश कोचर,अब्बास खान,नरेंद्र हाडके,इकबाल सर,अब्दुल मोहम्मद नईम,मकसूद बावा,अनिल कडू,मुकेश चौधरी,दशरथ ढोकपांडे ,ईकबाल पहेलवान,सतीश वखरे इत्यादी उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज -24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!