शिवणी शिवारात आगीत ५ एकरातील ऊस जळून खाक ; शेतकऱ्याचे १५ लाख रुपयांचे नुकसान

0

प्रतिनिधी / समुद्रपुर:
तालुक्यातील शिवणी शिवारातील शेतकऱ्यांच्या ५ एकरातील उसाला आग लागून ऊस व पाईप,केबल जळून भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार हळदगाव शिवणी शिवारातील शेतकरी किशोर दिघे यांचे शेत असुन त्यांनी आपल्या ५ एकर शेतात ऊसाची लागवड केली होती.शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेताजवळ असलेल्या नाल्यात आग लागली पाहता पाहता हि आग किशोर दिघे यांच्या ऊसाच्या शेतात शिरली व आगीने रौद्ररूप धारण केले.यावेळी आजू बाजूच्या शेतकऱ्याना आगीचे लोंढो दिसताच त्यांनी‌ शेतकरी किशोर दिघे यांना दुरध्वनी वरुन कळले सरपंच जगदिश वरटकर आणि विजय श्रिरसागर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आजूबाजूच्या विहीरीवरुन पाणी घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग ओटोक्यात यायच नाव घेत नव्हती यावेळी हिंगणघाट,व सिंदी रेल्वे येथे नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले दोन्ही अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन जवळपास साडेतीन तासांच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळविले.मात्र तोपर्यंत शेतातील ९० टक्के पेक्षा जास्त उस जळून खाक झाला या आगीत पाईप, केबल व शेतीचे साहित्य मोठ्या प्रमाणात जळाल्याने शेतकरी किशोर दिघे यांचे १५ लाख रुपयांच्या जवळपास नुकसान झाले आहे.तलाठी यांनी पंचनामा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!