शिवसेना (उबाठा)वंचित बहुजन विकास आघाडीचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा.

0

हिंगणघाट : शिवसेना ( उबाठा) तसेच वंचित बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१९ रोजी नागरीकांच्या विविध मागण्यांना घेऊन थेट नगर पालिका कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.शहरातील कारंजा चौक येथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले.सदर मोर्चा नगरपालिका कार्यालयात गेल्यानंतर शहरातील नागरिकांच्या विविध समस्येबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, बहुजन विकास आघाडीचे अशोक रामटेके व शिवसेना तालुकाप्रमुख सतीश धोबे, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार ,शहरप्रमुख सतीश ढोमणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.निवेदन देताना सर्वप्रथम शिष्टमंडळातर्फे नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरातील सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर विशेष चर्चा करण्यात आली चर्चा करीत मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांचे प्रतिनिधीस विविध समस्या अवगत करण्यात आल्या.नगरपालिकेच्या कर विभागाकडून मागील ७- ८ वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दि.२० जुलै २०१५ च्या आदेशाचे उल्लंघन करून जनतेकडून मनमानी मालमत्ता कर वसुली करण्यात येत आहे.सन २०१५ ला सर्वोच्च न्यायालयाने २०१५-२०१६ च्या नगर परिषदेने केलेल्या करमुल्यांकनाला रद्द करुन अवैध वसूली थांबविण्याची मागणी करण्यात आली.मागील सात ते आठ वर्षांपूर्वीपासून अमृत योजनेतील मल निसारण गटार व्यवस्था व पिण्याचे पाण्याकरिता पाईपलाईन सह बारा पाण्याची टाकी याची दुरावस्था बाबत या निवेदनातून मुख्याधिकाऱ्यांचे प्रतिनिधीशी चर्चा करण्यात आली.मल निसा:रन तसेच पिण्याचे पाण्याची नवीन पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण होईपर्यंत कुठल्याही नवीन विकास कामाला मान्यता देऊ नये.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांना तिसरा टप्प्या चे अनुदान अजून पर्यंत वितरित करण्यात आलेले नाही. त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण निर्माण असून तात्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.नगरपरिषद आस्थापनावर स्थाई नगर रचनाकार अधिकारी, नसल्यामुळे जनतेला त्रास होत असून कायमस्वरूपी नगररचनाकाराची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची बाब मुख्याधीकारी गायकवाड यांचे निदर्शनास आणून दिली.महाराष्ट्र शासनाने ज्या नवीन कर निर्धारण करण्यावर बंदी घातली आहे . नवीन मालमत्ता कर निर्धारण मोजणी करिता शहरातील विविध भागात पालिकेने ठरवून दिलेल्या एजन्सीचे कर्मचारी फिरत आहे. नगर पालिका प्रशासनाने याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी चर्चे दरम्यान शिष्ट मंडळाच्या वतीने करण्यात आली. शिष्टमंडळाने यावेळी एकूण ७ मागण्याविषयी चर्चा करीत मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले.पालिका प्रशासनाने सर्व विषयावर सकारात्मक कारवाई न केल्यास पुढे पालिकेच्या च्या मुख्य द्वारानजिक धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.निवेदन देताना उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने, मनीष देवडे,श्रीधर कोटकर, अशोक पराते, मनोज रुपारेल , माजी उपाध्यक्ष भोलासिंग चव्हाण, सुनील आष्टीकर ,दिलीप चौधरी, बंटी वाघमारे ,पवन तिवारी, रंजीत रहाटे ,बलराज डेकाटे, अनिल लालटेंवार, दिलीप वैद्य, तुळशीदास हिंगे ,अशोक भाले, रवी कांबळे, रमेश घोडे, भास्कर ठवरे ,सचिन मुळे, नितीन वैद्य, गजानन काटोले, शंकर मोहमारे, अनंता गलांडे, विवेक कांबळे, नरेंद्र गुळकरी ,अनिल कडू, नितेश चंदनखेडे, दीपक सुर्वे ,आनंद जनबंधू , अजाब शेंडे, विनोद भुते इत्यादी शिवसैनिक व वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!