शिवसेना शहर संघटन पदी इम्रान पठाण यांची नियुक्ती

Byसाहसिक न्युज24
राळेगाव/ नितीन हिकरे:
तालुक्यातील मनमिळाऊ स्वभाव असलेले नेहमी लोकांच्या संपर्कात राहणारे वेळ कोणतेही असो लोकांच्या हाकेला धाऊन जाणारे अशी त्यांची तालुक्यात ओळख असणारे इम्रान पठाण याची शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार इम्रान पठाण यांची राळेगाव शहर संघटन पदी नियुक्ती करण्यात आली .त्यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.अनेक कार्यकर्त्यांकडून तसेच जिल्हा प्रमुख यांच्या कडून इम्रान पठाण यांचे अभिनंदन करण्यात आले . त्याच्या राळेगाव शहरात मोठा मित्र परिवार आहे.त्याच्या नियुक्ती मुळे राळेगाव तालुक्यात शिवसेना पक्षाची ताकद वाढेल असे बोलल्या जात आहे.