शिवसेना शिंदे गट सिंदी शहर प्रमुखपदी बबलू गवळी यांची नियुक्ती.

0

सिंदी (रेल्वे) : ८ ऑक्टोंबर रोजी रविवारला सिंदी रेल्वे येथे किशोर भांदकर यांच्या घरी शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणी करीता छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला अशोक शिंदे ( संपर्कप्रमुख,वर्धा जिल्हा ) यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले.जेष्ठ शिवसैनिक किशोर भांदकर यांनी उपस्थितांतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” जय भवानी, जय शिवाजी” असे जयघोषाने स्वागत करण्यात आले. उपस्थितांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षाची जनतेबद्दल असलेली आपुलकी व संघटनात्मक विचारसरणी बाबत विचार मांडले.
सभेत सिंदी रेल्वे शहरातील व बाजुच्या ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते बबलूभाऊ गवळी यांची सिंदी शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.तसेच सर्व उपस्थित नागरीकांना कार्यक्रमानंतर अल्पोहारांची व्यवस्था करण्यात आली होती. 

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!