शिवाजी चौकात, शिवाजी कोण होता? पुस्तकाचे सामूहिक वाचन

0

🔥शिवाजी चौकात, शिवाजी कोण होता? पुस्तकाचे सामूहिक वाचन. 🔥शिवाजी महाराजांचे अवमान करणारे आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी जोरदार निदर्शने.

🔥आयटक,पुरोगामी पक्ष, संस्था, संघटना समन्वय समिती वर्धा च्या वतीने दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी शिवाजी चौक वर्धा येथे शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

🔥आक्षेपार्ह, अश्लील व जीवे मारण्याची धमकी देणारे आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करणे व आमदारकीचा राजीनामा घेण्यात यावे.

🔥बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांची केलेले अपमान केला असून तात्काळ अटक करा या मागण्यांचा निवेदन गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्या नावाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

वर्धा -/ शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजून 52 मिनिटांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे माजी राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांना गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या संदर्भात फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून लोकशाही मूल्यांना व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारी आहे. आमदार संजय गायकवाड यांनी भूतकाळामध्ये अशीच गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये केली आहेत. एकूणच त्यांचे वर्तन हे आमदार म्हणून अशोभनिय व महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंक लावणारे आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज हे तुझ्या आईचा नवरा होते काय’ असे वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

“शिवाजी कोण होता?” हे पुस्तक इतिहासाचा चिकित्सक व अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडणारे असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे विवेकी व पुरोगामी विश्लेषण करते. समाजात वैज्ञानिक दृष्टी, समता आणि ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याची प्रेरणा देणारे हे महत्त्वपूर्ण लेखन आहे. तसेच या अगोदर 1926 रोजी प्रबोधनकार ठाकरे यांनी असेच चिकित्सक पुस्तक दगलबाज शिवाजी या नावाने लिहिले. त्याचबरोबर गणेश कुऱ्हाडे या लेखकांनी 1939 रोजी “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक लिहिले होते.

जेव्हा खऱ्या अर्थाने प्रशांत कोरटकर, गोविंद गिरी, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात तेव्हा संजय गायकवाड सारखे लोक हे हेतू पुरस्कार मूग गिळून गप बसलेले असतात.

तथापि, आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकांच्या प्रचार- प्रसारावरून प्रशांत आंबी यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, तसेच जाती- जातींमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे, महापुरुषांचा अपमान करणे व महिलांविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरणे, हे अत्यंत निंदनीय व कायद्याच्या विरोधात आहे.

1) आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा.

2) त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी, जातींमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे व महिलांविषयी अश्लील वक्तव्य करणे या गंभीर गुन्ह्यांखाली तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी.

3) गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये आमदार संजय गायकवाड यांची सखोल चौकशी करण्यात यावी.

4) एका कार्यक्रमात बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल अपमानास्पद उद्गार काढले त्याबद्दल त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

लोकशाही व्यवस्थेत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही शासनाची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या धमक्या व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला पुरोगामी संघटनावतीने राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे

यावेळी आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे, भारतीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदुरकर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, डॉ अभ्यूदय मेघे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव द्वारका इमडवार भारतीय महिला फेडरेशनचे अनुराधा उटाणे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, प्रा. नूतन माळवी आयटकचे अल्का भानसे उज्वला माखले आम्रपाली बुरबुरे रेखा कोटेकर जया मोटघरे कोमल कोल्हे एडवोकेट नंदकुमार वानखेडे विजय तांबे महेश दुबे जानराव नागमोते राजेंद्र कळसाई प्रफुल्ल गुल्हाने अक्रम पठाण अविनाशजी उबाळे सुधीर गवळी कपिल थुटे सपना शेंडे ,एडवोकेट पूजा जाधव संदीप शिंदे संगीता रेवडे रोहिणी पाटील सुनील ढाले अमर देशमुख सतीश आत्राम अशोक हेडवू डॉक्टर उमाजी नांन्हे रिंकू घोडेश्वर धनंजय देशमुख अनिता कांबळे वैशाली होलघरे छाया सातपुते विजय लोणारे कल्पना हेडावू विशाल हजारे दिनेश गुजरकर अभिजीत चौधरी मयूर डफळे चंद्रशेखर घोडे हेमंत खोडे मोहित ठाकरे मेहमूद प्रितेश देशमुख सुजन खंडारे मयुरेश देशमुख विकी तळवेकर कुणाल देशमुख नितेश नकवे, प्रणय रोडे ओम बरबटीया विनय डहाके इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

          ब्युरो रिपोर्ट साहसिक              News-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!