शेतकऱ्यांचा शेत मशागत वेगात , मात्र, बी बियाणे करिता धावपळ सुरू

0

By साहसिक न्युज 24
गजेंद्र डोंगरे / मदनी (आमगाव) :
जून महिना लागताच शेतकऱ्यांची आता खरीप पिकांसाठी शेती मशागतीला वेगात सुरुवात झाली असून बळीराजा खरीप पिकाच्या पेरणीसाठी जमिनीच्या मशागत करण्यात व्यस्त दिसून येत आहे. शेतातील रब्बी हंगामातील सर्व पिकांची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. आता मात्र बळीराजा बी बियाण्याची निवड तसेच व्यवस्था करण्यात मोठ्या जोमाने तयारीला लागला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मे महिन्यात शेतातील फण, केर कचरा उचलून शेत साफ करून नांगरणी करून ठेवण्यात आली होती.मात्र, मागील पंधरवड्यात परिसरात तुरळक तसेच दमदार पावसाच्या सरी दिसून आल्या होत्या त्यामुळे जमीन गुळगुळीत नरम झाली आहे.
या आधुनिक युगात बैल जोडी ची संख्या रोडावली असून जमिनीची मशागत ट्रक्टरद्वारे करताना दिसून येत आहेत. दिवसेंदिवस डिझेलचे भाव वाढत असून जमीन नागरणीचे दरातही वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षापर्यत एकरी पंधराशे भाव होता. चालु वर्षी त्यात वाढ होऊन दोनहजार पर्यत गेल्याने सर्वसाम्यान शेतकऱ्यांला वाढीव दर परवडणारे नाहीत असे मत व्यक्त होत आहे .मात्र,शेतीवर खर्च भरपूर होत असून रासायनिक खते, बी बियाण्याचे भाव वधारले आहे.मात्र, देवसेन.दिवस जमिनीचा कस कमी होत असून वन्य प्रण्याचा त्रास कमी होत नाही.पीक मात्र जेमतेम होत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र , महागाई मुळे शेती खर्चात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात. आता बळीराजा खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे.उन्हाळी कांद्याची काढणी,शेंगदाणा काढणी जवळपास पूर्ण झाली असून भावा अभावी शेंगदाणा,कांदा बऱ्याच शेतकर्यांनी चाळीत साठवणूक करून ठेवला आहे.पुढे या पिकावर बी बियाण्याचा व शेतीच्या खर्चास मदत होईल या आशेवर. परिसरात शेतीची नागरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे करतांना दिसून आली आहे.नागरणी झाल्यावर त्याची वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याच्या कामे वेगात करण्यात आली आहे. जमीन बैलजोडीच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरने बेले पाडण्याचे कामे केली आहे . सध्या सोयाबीन, कपास पीक सोडल्यास शेतीत पिकवलेल्या मालाला भाव नसल्याने आता खरिपात कोणते पीक घ्यावे याची काळजी शेतकऱ्याला सतावत आहे. मात्र, कपास या पिकाला शेतकरी सर्वाधिक पसंती देत आहे.
निसर्गाचा अनियमितपणा दिसून येत असतो.कधी भरपूर पाऊस तर कधी कमी यामुळे ओला दुष्काळ तसेच कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बेमौसमी पावसाचा फटका..दोन-तीन वर्षापासून बेमौसमी पाऊसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या हाती पिके न आल्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे . शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न उद्भवत आहे .त्यामुळे शेतकऱयाने पुढे भाव मिळेल या आशेने अल्पशा पैशातून बी-बियाणे ,खते ,मजुरी आदीचे नियोजन होणार नाही म्हणून कोणाकड़े उसनवार पैसे मिळतील व त्यातून बियाणे खरेदी करता येईल म्हणून शेतकरी फिरताना दिसत आहे. सरकार जरी खरीप हगामात खत टंचाई होउ देणार नाही याची ग्वाही देत आसली तरी ऐन मोसमात खत टंचाई जाणवते हा आनुभव दिसून आला होता .त्यामुळे रासयनिक खताचा तसेच काळा बाजार होणार नाही.अशी व्यवस्था करण्यात यावी.तसेच बाजारात येणाऱ्या बोगस बियाण्यावर आळा बसावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!