शेतातील बैलाचा गोठा आगीत जळून खाक पाथरी शिवारातील घटना
प्रतिनिधी /सागर झोरे:
देवळी तालुक्यातील गिरोली येथील शेतकरी अरुण गावंडे यांची मौजा पाथरी येथील ओलिताची पाच एकर शेती आहे.शेतामध्ये सिंचन विहिरीजवळ बैलाचा गोठा असून शनिवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास लागलेला आगीमध्ये बैलाचा गोठा जळून खाक झाल्याची घटना मौजा पाथरी शिवारात घडली बैलाच्या गोठ्यामध्ये शेती अवजारे स्पिंकलर पंप ड्रीप जनावरांचा चारा बैलबंडी शेती साहित्य या आगीत जळून खाक झाले.या बैलाच्या गोठ्यामध्ये जनावरे सुद्धा होती या आगीत बैल व गाय गंभीर जखमी झाले बैलाच्या गोट्याला लागलेल्या आगीमध्ये सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली शेतकरी अरून गावंडे यांनी घटना प्रकरणी देवळी येथील पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे शेतातील बैलाच्या गोठ्या मध्ये लागलेल्या आगीत शेती अवजारे साहित्य सह स्पिंकलर ड्रीप जनावराचा चारा सर्व जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांसमोर येन खरीप हंगामाच्या तोंडावर अशी घटना घडल्यामुळे मोठे संकट त्याच्यासमोर उभ आहे पहिलेच यावर्षी पीक पाणी झालं नाही तसेच काही वर्ष कोरोनात सुद्धा गेले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे हेच कर्जाचा डोंगर माथ्यावर असून कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे.तरी शासनांनी त्यांना मदत करावी व ही आग कशामुळे लागली याचा तपास करून लवकरात लवकर चौकशी करून त्या शेतकऱ्याला न्याय मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच या घटनेचा पंचनामा गिरोली येथील तलाठी चायकाटे यांनी केला आहे.