शेतीसाठी’अर्धांगिनीचे’दागिनेही लावलेत दावावर!’सितादेवी’न पाहताच आत्महत्येने झाला अखेरचा शेवट…

0

Byसाहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
दरवर्षी होणारी नापिकी व शेतीच्या उत्पन्नात येणारी घट व निसर्गाच्या लहरीपणामुशेतकरी बेजार झाला आहे. याला कंटाळून विजयगोपाल येथिल युवा शेतकरी नितीन किसनाजी खोडे वय ४० वर्षे यांनी शेतात जाऊन येतो असे सांगून नितीन स्वताच्या शेतात गेला व शेतालगत असलेल्या संजय झोपाटे यांचे शेतातील विहीरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतक नितीन हा खाजगी कर्ज, कृषी केंद्राची उधारी व घरगुती दागिण्यांची गहाणगुट्टा करुन शेती करतं असतांना सततंची नापिकी व यावर्षी झालेली दुबार , तिबार पेरणी करुन सुध्दा सततंधार पावसामुळे संपूर्ण शेतीचे झालेल्या नुकसानीमुळे नितीनने आपली जिवनयात्रा संपविली .घरातं नितीन हाच कर्ता पुरुष असल्यामुले खोडे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतक नितीनच्या पश्चात वृध्द आई वडील पत्नी, तिन मुली असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!