सेलू :स्थानिक श्री संत केजाजी प्री प्रायमरी कॉन्व्हेन्ट घोराड येथे तान्हा पोळा साजरा करण्यात आला.पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो.वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलापती कृतंद्याता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचेच अवचित्य साधून श्री. संत केजाजी कॉन्व्हेन्ट येथे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात चिमुकल्यांनी शेतकऱ्यांच्या पोशाख परिधान करत तान्हा पोळ्यात सहभागी झाले होते. यावेळी सर्व पथम श्री. संत केजाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे संस्था संचालक तथा मुख्याध्यापक प्रशांत झाडे यांनी केले त्यानंतर सर्व नंदीचे विधिवत पूजन करतात आले. विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या शिक्षिका विद्या वांढरे , सुवर्णा पिसे, शिवानी राऊत, आरती भुरे, लुकेश झाडे, शोभा झाडे, पंकज तडस आदी उपस्थित होते.