संकटाचे_डोंगर_पेलणाऱ्या_बावणे_परिवाराला_आर्थिक_मदतीची_गरज.

0

हिंगणघाट : संकटे येतात तीही चारही बाजूने. असेच एका अतिशय गरीब मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर सध्या सुलतानी संकट कोसळले आहे.येथील इंदिरा गांधी वॉर्डातील मोलमजुरी करून पत्नी व एका मुलीच कुटुंब चालविणारा जालिंदर बावणे हा सध्या प्रँचड अशा जीवघेण्या संकटातून चाललेला असून एकावर एक कोसळत असलेल्या आपत्तीने त्याचे व त्याच्या कुटुंबाचे जीवन कठीण होत चाललेले आहे.जालिंदर याची 13 वर्षाची मुलगी चि पल्लवी ही मागील एका वर्षांपासून किडनीच्या विकाराने ग्रस्त आहे. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत.तिच्यावर सावंगी व एम्स नागपूर येथे उपचार सुरु आहेत. तिला रोज डायलेसिस करणे गरजेचे आहे. सध्या हे डायलेसिस येथील डॉ राहुल मरोठी यांच्या इस्पितळात सुरु आहे. तिच्या मानेतून हे डायलेसिस सुरु आहे. परंतु यामुळे तिच्या शरीरावर इन्फेक्शन वाढत आहे. त्यासाठी हातावर शस्त्रक्रिया करून डायलेसिस करणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी रुपये 60 ते 70, हजारचा खर्च आहे. मोलमजुरी करणारे तिचे वडील मोठ्या परिश्रमाने पोरीवर उपचार करीत होते. परंतु दुर्दैवाचा फेरा आला आणि 1 डिसेंबरला तिचे वडील रस्त्याने जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली व या अपघातात ते जखमी झाले. त्यांच्या उजवा हाताला गंभीर दुखापत झाली. कुटुंबातील कमविता एकुलता एक व्यक्तीच आता हॉस्पिटल मध्ये भरती आहे.एक गंभीर आजाराचा रुग्ण घरात असताना कर्ता व्यक्ती बेडवर गेल्याने या कुटुंबा समोर गंभीर असे संकट उभे झालेले आहे.अशा या बिकट अवस्थेत या असहाय परिवाराच्या मागे उभे राहणे मानवतेच्या दृष्टीनेआवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सदसदविवेक बुद्धीला विनम्रपणे आवाहन करून या बावणे कुटुंबियांच्या मागे उभे राहण्याची विंनती करतो.आपण फुल ना फुलांची पाकळी म्हणून थोडीफार आर्थिक मदत या परिवाराला करावी अशी मी आपणास कळकळीची विनंती करीत आहे.

बँक खाते आई व वडील यांचे
भारतीय स्टेट बँक शाखा हिंगणघाट येथील
सौं शर्मिला व श्री जालिंदर बावणे यांचा संयुक्त बँक खाते क्र.
Ac.No. 34554104439
IFSC.Code SBIN0000382

कृपया मानवतेच्या हितासाठी आपली आर्थिक मदत वरील अकाउंट नंबर वर अपेक्षित आहे.
(पैसे पाठविल्याच्या स्क्रीन शॉट कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवा)

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!