सप्तसूर्य बहुउद्देशीय संस्था तफे युवक युवती व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न व प्रमाणपत्र वाटप
Byसाहसिक न्युज 24
सागर झोरे / देवळी :
सप्तसूर्य बहुउद्देशीय संस्था वर्धा जिल्हा क्रीडा विभाग वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने युवक कल्याणी योजने अंतर्गत युवक युवती व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन सावंगी मेघे येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष हरेन्द्र खंडाईत , सचिव आश्र्विनी खंडाईत, कोषाध्यक्ष स्वप्निल सूटे , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नितीन घमंडी, कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून पत्रकार गणेश शेंडे , प्रमुख पाहुणे आशिष गुजरकर, सामाजिक कार्यकर्ता प्रमुख मार्गदर्शक दीपक लाहोटी वर्धा व युवक युवती उपस्थिती होते.
सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविकात माहिती संस्थेचे अध्यक्ष हरेंद्रा खंडाईत यांनी दिली.
त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक पत्रकार गणेश शेंडे यांनी मार्गदर्शन केले, यानंतर प्रमुख पाहुणे आशिष गुजरकर यांनी जीवनात युवक कल्याण बद्दल मार्गदर्शन दिले प्रमुख मार्गदर्शक दीपक लाहोटी यांनी व्यक्तिमत्व बद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नितीन घमंडी यांनी युवक व्यक्ती करिता मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शिबिरात उपस्थिती युवक युवतींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . शिबिराला मोनाली नगराळे, पल्लवी सुट्टे, अंकिता कांबळे, पूजा वाघमारे , विजेंद्र खंडाईत , पूजा सिरसाट , मनीषा खंडाईत, निखिल वाघमारे, आचल इंगोले, रोहन सिरसाट, शुभांगी खंडाईत, लक्ष्मी खंडाईत, अमोल जुनघरे, साजन डुबडूबे , गजानन कराळे व युवक युवती उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष स्वप्नील सुटे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सचिव जितेंद्र खंडाईत यांनी मानले.