सरकारने घर दिले,आणि त्यांनी बाजारात विकले,घरकुल लाभार्थींचा मोठा गैरवापर,तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे…!

0

🔥सरकारने घर दिले,आणि त्यांनी बाजारात विकले,घरकुल लाभार्थींचा मोठा गैरवापर,तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे!

नागपूर -/ गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातल्या सोनपुरी (कुणबीटोला) गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्या अनेक लाभार्थ्यांनी आपली घरे शासनाच्या परवानगीशिवाय इतरांना विकली आहेत.ही योजना गरिबांसाठी असताना, काही लोकांनी ती पैसे कमावण्याचं साधन बनवलं आहे. स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असून, यामुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे.याबाबत गावातील रहिवासी प्रदीप शेषराव बावनथडे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.सरकारने त्वरित लक्ष दिले नाही तर अशा योजनांचा उद्देशच संपून जाईल!

गजानन ढाकुळकर साहसिक News-/24 नागपूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!