सर्पदंशाने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ दिग्रस:
दिग्रस येथील देवनगर भागातील शोभा गजानन भटकर( ४५) या महिलेचा आज सर्पदंशाने मृत्यू झाला. तिच्या पश्चात पती दोन मुलं आणि एक सून असा परिवार आहे
याबाबत सविस्तर असे की आज पहाटे पाच वाजता किडा चावला की साप या कारणाने उपचारादरम्यान संभ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांचा बीपी वाढला म्हणून यवतमाळ कडे रवाना करण्यात आले परंतु वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदन करून दुपारी मृतदेह राहते घरी दिग्रस देवनगर येथे आणण्यात आले व दुपारी ४ ३० वाजता शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार पार पडला .