सर्वात मोठा खुलासा : ‘हे’ जीव कायम पाठवायचे संदेश, मात्र माणसाने केलेलं दुर्लक्ष…
साहसिक न्युज24
ब्यूरो रिपोर्ट:
आपण कुठे शांत ठिकाणी गेलो किंवा एखाद्या जंगलात गेलो की आपल्याला तिथल्या पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू येतात. हा किलबिलाट सुखावणारा असतो. याचसोबत रात्रीच्या वेळी काही विशिष्ट आवाज आपल्याला काळजाचा ठोका चुकवणारे किंवा मनात भीती निर्माण करणारे असतात. अगदी ट्रॅफिकपासून ते अवकाशातील आवाज तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून ऐकले असतील. याच आवाजांवर एका वैज्ञानिकाने संशोधन आणि अभ्यास केला. यामध्ये आतापर्यंत मुक्या समजल्या जाणाऱ्या 53 समुद्री जीवांच्या आवाजावर आभ्यास केला गेला आहे. हे मुके समजले जाणारे समुद्री जीव एकमेकांसोबत संवाद साधतात, हे समोर आलं आहे. ज्या संशोधकाने हा अभ्यास केला त्यांचं नाव गेब्रियल जोर्गेविच-कोहेन असं आहे आणि त्यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, “हे जीव कायम एकमेकांना संदेश पाठवतात , संवाद साधतात, मात्र आपण त्यांचा आवाज ऐकण्याचा कधीही विचारच केला नाही.”
गेब्रियल जोर्गेविच-कोहेन यांनी संभोग करू इच्छिणाऱ्या किंवा अंड्यातून बाहेर येऊ पाहणाऱ्या कासवांचा आवाज मायक्रोफोनमधून रेकॉर्ड केला आहे. गेब्रियल जोर्गेविच-कोहेन याबाबत सांगतात की, पृष्ठवंशी जीव त्यांच्या नाकावाटे श्वास घेतात आणि एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विशिष्ट काही प्रकारचे आवाज काढतात. हे 400 दशलक्ष वर्षे जुन्या पूर्वजांचे वंशज आहेत . स्वित्झर्लंडमधील झुरिच विद्यापीठातील पीएचडीचे विद्यार्थी गेब्रियल जोर्गेविच-कोहेन यांनी सागरी प्राणी संवादासाठी ध्वनी वापरतात असं ते म्हणतात.
या प्राण्यांचा आवाज ऐकणं होतं कठीण
जगभरातील 53 प्रजातींबाबत आभ्यास करण्यासाठी, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी साऊंड आणि व्हिडीओ उपकरणांचा वापर केला. यामध्ये ब्रिटनमधील चेस्टर प्राणीसंग्रहालयाचा देखील समावेश आहे. या जीवांमध्ये 50 कासवं , एक तुतारा, एक लंगफिश आणि एक सिसिलियन यांचा समावेश होते. आतापर्यंत हे सर्व जीव मुके आहेत अशी धारणा होती. मात्र संशोधक गेब्रियल जोर्गेविच-कोहेन म्हणतात की आपण त्यांना कधी ऐलकंच नाही. या सर्व जीवांचा आवाज ऐकणं अत्यंत कठीण होतं असंही ते म्हणतात.
माणसांकडून सागरी जिवांकडे दुर्लक्ष
BBC सोबत गेब्रियल जोर्गेविच-कोहेन यांनी बातचीत केली. त्यांच्याशी संवाद साधताना ते म्हणतात, जेंव्हा पक्षी सुंदर आवाज काढतात किंवा शीळ ठोकतात तेंव्हा ती आपल्याला ऐकू येते. याबाबत कुणाला याबाबत वेगळं सांगायची गरज भासत नाही. जमिनीवरील जीवांच्या तुलनेत समुद्री जीव हे शांत असतात, असं आभ्यासकर्ते सांगतात. हे जीव अतिशय कमी वेळेस म्हणजेच दोन दिवसात एकदाच आवाज काढतात. कोहेन म्हणतात की जमिनींवरील जीवनाकडे मानवाचं विशेष प्रेम राहिलंय, म्हणूनच पाण्याखालील जीवनाकडे मानवाचं दुर्लक्ष झालं असं ते म्हणतात.