सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय,वर्धा आणि जलजीविका संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यामानाने मत्स्यवृद्धीसाठी मत्स्यशेतकरी आणि मच्छीमारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजीत….

0

वर्धा -/ सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय वर्धा आणि जलजिविका संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने समाज कल्याण सभागृह वर्धा येथे मत्स्यव्यवसाय वृद्धीसाठी मत्स्यशेतकरी आणि मच्छीमारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेमध्ये एकूण 130 पेक्षा अधिक लाभार्थी व मत्स्यव्यवसायिक उपस्थित होते.यावेळी नागपूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय नागपूर सुनील जांभुळे उपस्थित राहून त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेविषयी विस्तृत माहिती देऊन, मासे विक्री योग्य झाल्यानंतर मासे काढणे मासे हाताळणी आणि मासे वाहतूक व विपणन याबाबत मार्गदर्शन केले.तसेच वर्धा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय स्वप्निल वालदे यांनी सर्व उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत केले व मत्स्य व्यवसाय वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सांगितले.जलजीविका संस्थेचे सल्लागार समीर परवेज यांनी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात बाजारपेठ सोयी सुविधा, मत्स्य उत्पादकाच्या अडीअडचणी व त्यावरील तोडगा या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच यावेळी ॲक्वा ई -मित्र चाटबॉट ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मत्सव्यवसाय विषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.कार्यशाळेमध्ये वर्धा जिल्ह्यातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी मयंक सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएसडी, एक्वाकल्चर मार्य. नागपूर यांनी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन प्रकल्पामध्ये चांगले मत्स्यउत्पादन घेतल्यामुळे त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.सदर कार्यशाळेमध्ये मत्स्य व्यवसाय विभागामार्फत श्री स्वप्निल वालदे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, दी. रा. खोपे,स.म.वि.अ. वर्धा, बँक ऑफ इंडियाची जिल्हा व्यवस्थापक, चेतन शिरभाते, नाबार्ड मार्फत  सुशांत पाटील,मारबते अध्यक्ष, जिल्हा मच्छीमार सहकारी संघ मर्या.किशोर जगताप, राज्य कार्यक्रम प्रबंधक मिशिन समृध्दी ऑर्गनायझेशन.संजय बाभुळकर प्रोजेक्ट मैनेजर बायफ फाउंडेशन, मकसूद शेख सहायक नियंत्रण महाविम.समीर परवेज सलागार जलजिविका संस्था पुणे, गणेश तुळसकर, आरती पुसदकर, दामिनी अखंड, सुजाता बेस, रेमा तवाडे, लखन माळी, बिर्जेश बेरवा, आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी, महिला बचत गटाच्या महिला, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

चैताली गोमासे साहसिक NEWS-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!