🔥हीच ती दारू पार्टी करतात पोलीस स्टेशन येथे पुरावा दरवाजा जवळ आकाशी टी शर्ट घालून कर्मचारी हातात दारूचा बमफर पार्सल बोलाविलेला लक्षात येते🔥कशा प्रकारे करतात पदाचा दुरुपयोग हे लक्षात येते
🔥साक्षदार कोण होमगार्ड की शेतकरी शेत मजूर ? पंचनामा खोटा तयार केला हे लक्षात येते तसा पुरावा आहे,सीसीटीव्हीत होमगार्ड, पंचनाम्यात शेतकरी-शेतमजूर!
🔥सचिन वाघे यांचा पुराव्यांसह खळबळजनक खुलासा; दहेगाव पोलीस ठाण्यातील प्रकाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
वर्धा -/ पोलीस यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करून निरपराध नागरिकांना गुन्ह्यांमध्ये अडकवतात का? पंचनाम्यात चुकीची माहिती नोंदवून खोटे साक्षीदार उभे केले जातात का? असे गंभीर प्रश्न सचिन वाघे यांनी दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात २९ मे रोजी घडलेल्या कथित प्रकाराबाबत उपस्थित केले आहेत.
वाघे यांच्या म्हणण्यानुसार, २९ मे रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास ते दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमधील महत्त्वाची माहिती, आवश्यक कागदपत्रे, संपर्क क्रमांक आणि विविध ॲप्समधील माहिती फॉरमॅट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच धमकी देऊन कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सोबत आणलेले वाहन परत न देता रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांना दहेगाव पोलीस ठाण्यापासून हिंगणघाटपर्यंत पायदळ जाण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर वाहनावर चालानची कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
🔥1) पंचनाम्यातील साक्षीदारांच्या ओळखीवर गंभीर प्रश्न
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे पंचनाम्यातील दोन साक्षीदारांची ओळख. पंचनाम्यात एका साक्षीदाराला शेतकरी तर दुसऱ्याला शेतमजूर म्हणून दर्शविण्यात आल्याचे वाघे यांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित दोन्ही व्यक्ती प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात मदतीसाठी कार्यरत होमगार्ड असल्याचा त्यांचा दावा आहे.
यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा उपलब्ध असल्याचे वाघे यांनी सांगितले. त्यामुळे पंचनाम्यातील साक्षीदारांची ओळख, होमगार्डचे ड्युटी रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तींची पंचनाम्यात शेतकरी व शेतमजूर अशी नोंद का करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
🔥2) सीसीटीव्ही पुरावा असताना चौकशी अहवालात उल्लेख का नाही?
या संपूर्ण घटनेबाबत वाघे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज, पंचनामा आणि साक्षीदारांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, चौकशी अहवालात सीसीटीव्ही फुटेजमधील महत्त्वाच्या बाबींचा अपेक्षित उल्लेख करण्यात आलेला नाही.
उपलब्ध फुटेजची सखोल तपासणी का झाली नाही? पंचनाम्यातील साक्षीदारांची प्रत्यक्ष ओळख तपासली का नाही? संबंधित होमगार्डची ड्युटी नोंदवही तपासण्यात आली का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
🔥3) निरपराध व्यक्तीला गुन्हेगार ठरविण्याचा अधिकार कुणाला?
एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची नोंद पोलीस रेकॉर्डवर राहते. मात्र, संबंधित व्यक्तीने गुन्हा केलेलाच नसेल आणि चुकीच्या पंचनाम्याच्या आधारे त्याला आरोपी करण्यात आले असेल, तर त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेचे आणि भवितव्याचे काय? अशा प्रकारांमुळे निरपराध व्यक्तींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
🔥4) वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का?
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची स्वतंत्रपणे पडताळणी करावी, पंचनाम्यातील दोन्ही साक्षीदारांची खरी ओळख निश्चित करावी, होमगार्डचे ड्युटी रजिस्टर तपासावे आणि संपूर्ण घटनाक्रमाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी सचिन वाघे यांनी केली आहे.
गंभीर आरोप आणि पुरावे समोर येत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित प्रकरणात ठोस कारवाई करणार का? दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का? की हे प्रकरण चौकशी अहवालापुरतेच मर्यादित राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेवरच गैरवापराचे आरोप होत असतील, तर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे.(क्रमशः)