आष्टी( शहीद )-/ आष्टी वरुड मार्गावर सायंकाळी साडेपाच वाजता फिरायला जाणाऱ्या महिलेला आयमा जवळील मोर्शी टी पॉईंट जवळ पाठीमागून सुसाट येणाऱ्या दुचाकी वाहनाने सो बेबी सुगंध राव मोकदम (वय 61) यांना बेधडक ठोस मारून गंभीर जखमी केले यात त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन महिला सुखरूप अपघातापासून बचावल्या वाहनांची एवढी जबरदस्त धडक होती की जखमी महिलेला शंभर फूट अंतरापर्यंत घासत नेले. दोन चाकी वाहनांचा नंबर एम एच 32 ये यु 88 46 असून पेठ अहमदपूर येथील खाद्य व्यवसायिक अनिकेत पाटणकर यांच्या मालकीची असून ती गाडी 14 वर्ष आतील मुलगा चालवत असल्याचे समजते त्या ठिकाणी असलेले प्रत्यक्ष दर्शनी सांगतात गाडी खूपच वेगाने चालवितात होता जखमी महिलेला स्थानिक लोकांनी उचलून ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे प्रथम उपचार करता भरती करण्यात आले मात्र तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना डॉक्टरांनी रेफर करण्याचे सूचना दिल्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून पुढील तपास संबंधित विभाग करत आहे.