सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंत्याच्या कक्षाला मारणार युवासेना काळा पट्टा

0

प्रतिनिधी / अमरावती ;
गेल्या दोन तीन वर्षांपासून करोडो रुपये खर्च करून अमरावती शहरातील सर्व प्रमुख रस्त्याचे कॉंक्रिटीकरण ची कामे सुरू आहे.परंतु जेपी नामक कॉन्टॅक्टर ही सर्व अर्धवट कामे सोडून प्रसार झाला आहे .
त्यामुळे अमरावतीकर नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे अर्धवट सोडलेले रस्त्यांमुळे दररोज किरकोळ अपघात होऊन अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे अमरावती शहराची ह्रदय स्थान असलेला राजकमल चौक ते सिटी कोतवाली पोलिस स्टेशन या मार्गावर अर्धवट कामे सोडल्यामुळे या परिसरातील स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय करून पोट भरणाऱ्या आणि विशेषता राजकमल चौकातील वृत्तपत्र विक्रेत्यांना या अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे दररोज त्रास सहन करावा लागत असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे सपशेल दुर्लक्ष आहे. सार्वजनिक बांधकामच्या या भोंगळ व मनमानी कारभाराविरोधात अमरावती युवा सेना येत्या काही दिवसात कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात काळा पट्टा मारो आंदोलन करणार आहे राजकमल चौकातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टोल समोरील अर्धवट पडलेले बांधकाम मटेरियल तसेच पेव्हीग ब्लॉकच्या ढिगारे, तात्काळ उचलण्यात न आल्यास राजकमल चौकातील वृत्तपत्र विक्रेत्यांची सर्व स्टॉल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात लावण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!