सावंगी (मेघे) येथील जमिनीच्या कागदपत्रात हेराफेरी करणारे आरोपी माजी खासदार दत्ता मेघे तसेच माजी आमदार समीर मेघे व अन्य दोन आरोपी विरोधात गुन्हे दाखल करून गजाआड करा – साहासिक जनशक्ती संघटनेची मागणी.

0

सावंगी (मेघे)/विशेष प्रतींनिधी:

विदर्भातील प्रसिद्ध महाठक माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार सागर मेघे, वैभव मेघे व मनिष वैद्य या चार  आरोपीने खोटे व बनावट दस्तावेज तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. साहासिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी सावंगी मेघे परिसरातील संपूर्ण इमारत बांधकाम संबंधी माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये माहिती मागितली असता दत्ता मेघे व त्याचं लेकरू सागर मेघे, नातू वैभव मेघे व नोकर मनीष वैद्य या चौघांनी बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवून तात्कालीन एसडीओ उत्तम दिघे व विद्यमान एसडीओ व सुरेश बगळे यांना खोटे दस्तावेज सादर करून उपयोगिता प्रमाणपत्र व सुधारित इमारत बांधकाम परवानगी घेतली आहे. परंतु सन २००० सालापासून दत्ता मेघे परिवार ग्रामपंचायत मध्ये टॅक्स भरत आहे. आणि सन १९८८ ला अकृषक जमिनीवर ७० कोटी रुपये कर्जाची उचल करून बॅंकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या महाठक विरोधात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार दिली.  परंतु सावंगी मेघे येथील ठाणेदार बाळासाहेब थोरात यांच्यावर मेघे परिवाराचा दबाव येताच सदर तक्रार चौकशी ठेवली आहे. परंतु साहसिक जनशक्ती संघटनेने मेघे पिता-पुत्र, नातू विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र यांना केली आहे. त्याच अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी मेघे पिता – पुत्राचा तपास सुरू केला असता या अधिकार्‍यावर सुद्धा राजकीय दबाव मेघे परिवाराने आणला आहे. परंतु “मेघे” च्या दबावाला न जुमानता सचिन यादव यांनी तपास सुरू ठेवला आहे. साहसिक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी मेघे परिवाराचा ४२० पणा उघड करण्यासाठी एक लाख रुपये खर्ची घालून माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती गोळा केली त्यामध्ये मेघे परिवारांनी बनावट एन. ए. आदेश, बनावट उपयोगिता प्रमाणपत्र तयार करून अकृषक जमीन असताना सत्तर कोटी रुपये कर्ज उचल केले. प्लॉटचे एकत्रीकरण न करताच इमारतीचे बांधकाम करणे मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम न करणे इत्यादी बाबी चौकशीमध्ये पुढे आल्या आहेत. एपीआय सचिन यादव यांनी सुद्धा सखोल चौकशी केली असता मेघे यांचे कागदपत्रे बोगस आढळून आल्याचा अहवाल एसडीओ सुरेश बगळे यांना दिला. या पत्राचे बगळे यांनी लवकरात लवकर उत्तर दिल्यास येत्या दहा दिवसात बनावट कागदपत्रे तयार करणारे दत्ता राघोबा मेघे, सागर दत्ता मेघे, वैभव अरुण मेघे व मनिष वैद्य या आरोपीविरुद्ध शासनाच्या कागदपत्रात हेराफेरी करून बनावट दस्तावेज खरे दाखवून आपला ‘उल्लू’ सरळ केला अशा या महाचोर विरोधात पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हजारोच्या संख्येने साहसिक जनशक्तीचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने अन्नत्याग आंदोलन करतील. सावंगी मेघे ग्राम पंचायतचा दत्ता मेघे परिवाराने पाच कोटी रुपये टॅक्स डूबविला आहे. हा टॅक्स वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा साहसिक संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी गावंडे यांना दिला आहे. येत्या महिन्यात दोन कोटी रुपये टॅक्स वसूल करून देण्याची जबाबदारी पंचायत विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांनी घेतली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!