🔥सावनेर मध्ये पट्टे वाटपाला सुरुवात.🔥आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय टेंभेकर यांच्या उपोषणाला यश.
सावनेर -/ येथे ५० वर्षापासून वंचित असलेल्या गरजूना आमदार डॉ.आशिषराव देशमुख यांच्या हस्ते नगरपरिषद कार्यालय येथे सकाळी १० वा. पट्टे वाटप करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, मुख्याधिकारी किरण बगडे मॅडम, रामराव मोवाडे,मनोहर कुंभारे उपस्थित होते.४५ गरजूंना हक्काचे पट्टे देण्यात आले तर १० जणांना तयार घरकुलांच्या चाव्या देण्यात आल्या.आशिषराव देशमुख म्हणाले त्याचे सर्व श्रेय आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय टेंभेकर व त्यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्याला जाते.१ डिसेंबर २०२४ रोजी आम आदमी पार्टीच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी यांना वार्ड नंबर १७ व इतर सावनेर येथील रहिवासी असलेल्या लोकांना पट्टे मिळावे असे निवेदन देण्यात आलेले होते.नंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी मा.जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले होते.अशा प्रकारचे निवेदन २ ते ३ वेळा दिलेले होते.परंतु यावर कुठलीही कारवाई होत असताना दिसत नसल्यामुळे पर्यायी म्हणून २२ जानेवारी २०२४ रोजी तहसील कार्यालय गेट जवळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष मा.संजयजी टेंभेकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली .सलग ४ दिवस आटोपल्यानंतर प्रशासनाला जाग आली व २५ जानेवारीला लिखित स्वरूपाचे आश्वासन उपविभागीय अधिकारी संपत खलाटे साहेब,किरण बगडे मॅडम मुख्याधिकारी नगरपरिषद सावनेर,वन अधिकारी राठोड साहेब, सावनेर चे ठाणेदार मानकर साहेब या चारही अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपाच्या आदेशावर सह्या करून तशा प्रकारचे पत्र टेंभेकर यांचे उपोषण सोडावे म्हणून लिहून दिले होते.सावनेरचे समाजसेवक मा. किरणजी जयस्वाल यांच्या हस्ते या उपोषणाची सांगता करण्यात आली होती.१ ते २ महिन्याच्या आत आम्ही ही प्रक्रिया करू असे त्या पत्रात नमूद करण्यात आलेले होते.परंतु एक वर्षाच्या कालावधी होऊन सुद्धा पट्टे मिळाले नाही त्यामुळे पुन्हा आमरण उपोषणनाची परवानगी देण्यात यावी अशा प्रकारचे पत्र उपविभागीय अधिकारी मा.खलाटे साहेब यांना देण्यात आले. उपोषणाला आपण थांबवावेत आपण पट्टे वाटपाची प्रकिया लवकर करु असे आश्वासन देण्यात आले.म्हणूनच त्या पट्टेवाटपाच्या प्रक्रियेला आज पूर्णविराम देण्यात आला.२४ मार्चला आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांच्या हस्ते या पट्टे वाटपाच्या कार्यक्रम घेण्यात आला.पन्नास वर्षा पासून राहत असलेल्या सावनेर येथील रहिवाशांना आपल्या मालकीचे घर देण्यात आले.पूर्ण सावनेरात पट्टे वाटपाच्या प्रक्रियेमुळे येथील रहिवासी खूप आनंदित झाले.व मिरवणूक काढून जनप्रतिनिधी व आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत म्हणून आनंदोत्सव साजरा केला.