सावली वाघ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

0

सिंदी (रेल्वे): राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सावली (वाघ) उपखंडाचा विजयादशमी उत्सव रविवारला संपन्न झाला. ५ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता गावातील शाखा मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी ४ : ३० वाजता सावली वाघ उपखंडातील सर्व स्वयंसेवकांचे गावामध्ये पथसंचलन निघाले होते. या दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचार प्रमुख अतुल शेंडे उपस्थित होते. “विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे” असे प्रतिपादन करित प्रमुख वक्ते अतुल शेंडे यांनी विविधतेतून एकतेचा, बंधुतेचा, व समतेचा संदेश दिला. विजयादशमी उत्सवात सर्व स्वयंसेवक आणि नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अशोक बोरकुटे उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जिल्हा संघचालक जेठानंदजी राजपूत, उपखंड कार्यवाह आशिष एकोणकर व तालुका कर्यकरणीतील समस्त अधिकारी होते.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!