सिंदी शहरातून सात किलो प्लास्टिक जप्त.

0

🔥 नगर परिषदेची मोहीम; प्लस्टिक न वापरण्याचे आवाहन

सिंदी (रेल्वे) : शहरात एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी करतांना विविध दुकानांमधून ७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. दिनांक १७ आणि १८ ऑक्टोंबर रोजी नगरपरिषद सिंदी प्रशासनाद्वारे शहरातील विविध दुकानाची तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्या अनुषंगाने नगरपरिषद सिंदीने सिंगल युज प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करीत सिंदी शहरातील किराणा दुकान, फार्मसी, फुटपाथ वरील दुकाने, पानटपरी, भाजीपाला दुकाने, चिकन, मटन विक्रेते, स्टेशनरी, फळ विक्रेते, स्वीट दुकाने, इत्यादी दुकानांची चौकशी केली. यामध्ये ७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या पत्रानुसार सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सूचना करण्यात आली. सप्टेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधी मध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी मोहिम दर महिन्याला राबविण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने नगरपरिषद सिंदीद्वारा सिंगल युज प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी सिंदी शहरातील लोकांना मुख्याधिकारी मधुकर ठाकरे यांचेकडून सिंगल युज प्लास्टिक न वापरण्याचे आव्हान करण्यात आले. सदर कारवाई मुख्याधिकारी मधुकर ठाकरे यांचे मार्गदर्शनात प्रशासकिय अधिकारी नंदकिशोर चव्हाण, प्रशासकिय अधिकारी अश्विनी आईटवार, स्वच्छता विभाग प्रमुख मोहसीन खान, नगर रचना अभियंता अनुराग गजभिये, लेखापाल अनुप कांबळे, सुभाष कवठेकर, नीलिमा राडे, आकाश रावले, भूषण तूर्क्याल, अभय रामटेके, इंद्रकुमार पालीवाल व पोलीस विभागाचे कर्मचारी यांनी केली. 

  दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!