सिंधी रेल्वे येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा फलकाचे अनावरण

0

सेलू / प्रतिनिधी:

नागपूर महामार्गावरील सिंधी रेल्वे येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रांत धर्मप्रसारक अटल पांडे , जिल्हा उपाध्यक्ष संजय बडगेवार , जिल्हा सहमंत्री अनिल कावळे, बजरंग दल जिल्हा संयोजक बबलू राऊत, बजरंग दल प्रमुख आदित्य कावळे, प्रखंड संयोजक रितेश पालीवाल आदी उपस्थित होते.
सिंधी रेल्वे येथील मुख्य चौकात शाखा फलक पाहुण्यांच्या उपस्थितीत लावून अनावरण करण्यात आले . प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते भारत मातेचे व श्री राम प्रभू यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना अटल पांडे म्हणाले हिंदू समाजावर अन्याय अत्याचार झाला तर त्यांचा सामना करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तत्पर असते तर या प्रसंगी बोलताना बबलू राऊत म्हणाले की आज हिंदूंनी एकजूट होण्याची गरज असून एकजुटीने कार्य करावे हिंदू धर्मावर अन्याय झाला तर न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आव्हान केले बजरंग दल नेहमी सेवा सुरक्षा या ब्रीद वाक्यावर चालत असून समाजावर कुठेही अन्याय झाला तर आम्ही तत्पर असतो असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!