सिलेंडरच्या स्फोटात दोन लाखांचे साहित्य जळून खाक
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/मुक्ताईनगर:
जामनेर तालुक्यातील एका रोजमजुरी करणाऱ्या एका परिवाराच्या घरात अचानक सिलेंडरचा स्फोट
झाला. यात एकूण एक दोन लाखांचे घरगुती सामान जळून खाक झाले आहेय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीय.
प्राप्त माहितीनुसार जामनेर तालुक्यातील सोनाळे येथील नामदेव कडू मराठे हे मजूर असून मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नामदेव हे नुकतेच कामावरून घरी परतले होते. त्यांची पत्नी स्वयंपाक करीत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये घरातील संपूर्ण जीवनावश्यक साहित्य तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. सिलेंडरच्या स्फोटात बाजरीचे धान्य, घरातील घरगुती सामान असे एकूण अंदाजे दोन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मराठे परिवाराला प्रशासन कडून मदत देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.