सेलूतील मंगेश ठाकरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Byसाहसीक न्यूज 24:
देवळी / सागर झोरे:
सेलू येथील रहिवासी मंगेश ठाकरे हे काही दिवसांआधी नागपूर येथे उपचाराकरिता भरती होते. उपचार सुरू असताना 15 मे रोजी 4. 30 वाजताच्या दरम्यान त्यांनी प्राण ज्योत मावळली.हृदय विकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली.मंगेश ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत समाजसेवा करून गोरगरिबांना न्याय मिळून देण्याचे काम केले. त्यांनी गरीब व श्रीमंत हा भेद कधीच केला नाही. माणूस पैश्याने नाही तर मनाने श्रीमंत असावा, अशी त्यांची विचारसरणी होती. सेलूतील लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर होता. मात्र अशातच गेल्या काही दिवसा अगोदर त्यांचे भाऊ सुहास ठाकरे व वडील चंद्रशेखर ठाकरे यांचे निधन झाल्याने संपूर्ण परिवारातील जबाबदारी मंगेश ठाकरे यांच्या कडे आली होती. आणि अश्यातच त्यांच्या अश्या अचानक निघून जाण्याने कुटुंबात शोकाकुल पसरला आहे. 15 मे रोजी मंगेश ठाकरे यांचे हृदयवीकराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर सेलू शहरातील लोकांमध्ये हळहळ वक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्यामागे एक मुलगा,पत्नी,आई असा आप्त परिवार आहे. आज दिनांक 16 मे रोजी सेलू येथील बोर नदी असलेली मोक्षधाम येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.