सेलू तालुक्यात प्रथमच जिल्हा स्तरिय पुरुष व महिला (सुपर लिग) निवड चाचणी.

0

सेलू :तालुक्यात प्रथमच जिल्हा स्तरिय पुरुष व महिला (सुपर लिग) निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. साहसिक जनशक्ती संघटना, गर्जना सामाजिक संघटना व वर्धा जिल्हा हौसी कबड्डी असोशियशन यांच्याद्वारे आयोजित भव्य वर्धा जिल्हा निवड चाचणी २०२३-२४ चे आयोजन दि. १,२ व ३ डीसेंबर २०२३ रोजी दिपचंद चौधरी विद्यालय, सेलु येथे करण्यात आले आहे. वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोशियशन वर्धा यांच्या सौजन्यानी सिनियर पुरुष व महिला ( सुपरलिग ) निवड चाचणी स्पर्धेत पुरुष वजन गट ७५ किलो ठेवण्यात आला आहे. या वजनाच्या आतील कोणताही खेळाडु स्पर्धेत भाग घेवु शकते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री स्वप्नील सोनवणे, तहसिलदार सेलू तर उद्घाटक म्हणुन श्री तिरूपती राणे ठाणेदार, पोलीस स्टेशन सेलु राहणार असुन प्रमुख अतिथी सौ. रेणुका रविंद्र कोटंबकार, सरपंच ग्रा. पं. कोटंबा तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी, सौ. कविता किशोर काटोले नगरसेवीका न.प. सेलु, श्री महेशसिंग ठाकुर, अध्यक्ष वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोशियशन वर्धा, तथा गर्जना सामाजिक संघटना, श्री रविंद्र कोटंबकार अध्यक्ष साहसिक जनशक्ती संघटना वर्धा, उपस्थीत राहणार आहे.तर दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी बक्षीस वितरण ठेवण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री केसरीचंद खंगारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी रेल्वे तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अमित गावंडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा , राहणार आहे. विशेष अतिथी म्हणुन श्री पवन तिजारे, जिल्हा समन्वयक भारत राष्ट्र समिती वर्धा, श्री वरुण दफ्तरी संचालक दफ्तरी सीड्स कं. सेलु तथा संचालक सिंदी कृषी उत्नन्न बाजार समिती, श्री महेशसिंग ठाकुर, अध्यक्ष हौसी कबड्डी असोशियशन वर्धा तथा गर्जना सामाजिक संघटना वर्धा श्री रविंद्र एन. कोटंबकार , अध्यक्ष साहसिक जनशक्ती संघटना वर्धा राहणार आहे.बाहेर गावावरुण येणार्‍या खेळाडुची जेवण, निवास व्यवस्था साहसिक जनशक्ती संघटने कडुन करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडुनी सहभाग नोंदवावा असे आव्हान आयोजन सागर राऊत शहर अध्यक्ष, साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवार यांनी केले आहे.

साहसिक न्यूज -24वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!