सोनेगाव(आ) येथील गौरी स्थापनेची १५२ वर्षाची परंपरा ठाकरे कुटुंबाची कायम
देवळी :तालुक्यातील तील सोनेगाव (आ.) येथील किरण वसंतराव ठाकरे यांच्याकडे गेल्या१५२ वर्षांपासून गौरी स्थापना करण्यात येत असून हे वर्ष गौरी स्थापनेचे १५३ वे वर्ष आहे. गणपती बरोबर येणाऱ्या सणाला विशेष महत्त्व आहे.महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. ठाकरे यांच्या कुटुंबात आपल्या कुलदैवते प्रमाणे गौरी बसविली जातात.पहिल्या दिवशी घरातील तुळसी पासून पावला-पावलांनी डोक्यावरून गौरीना आणून त्यांची स्थापना केली जाते.दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे जेवण देऊन त्यांचे तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते
सागर झोरे सहासिक न्यूज-24