“सोन्याच्या लालचीत गेले 10 लाख आरोपी चौवीस तासात गजाआड

0

सोन्याच्या लालचीत गेले 10 लाख आरोपी चौवीस तासात गजाआ ‘

• दिनांक 03/10/2023 रोजी फिर्यादी नइमोदीन मोहीउद्दीन काजी वय 63 वर्ष धंदा कपडा दुकान रा. हुदा कॉलनी, विनबा वार्ड, चंद्रपुर यास आरोपी नामे प्रभु लालसिंग चव्हान वय 42 वर्ष धंदा मजुरी रा वानखेडे ले-आउट उमरेड, जि नागपुर याने त्याचे एका साथीदारासह फिर्यादीस ख मध्ये एक से दिड किलो वजनाचे सोन्याचे दागिने मिळाले असल्याचे सांगून ते 16,00,000 रू. मध्ये खरेदी करण्याबाबत म्हटले वरून फिर्यादी यांनी 8,00,000/- रू मध्ये सदरचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याबाबत सौदा ठरला असल्याने दि. 03/10/2023 रोजी फिर्यादी व त्यांचा मुलगा जुनैद परवेज असे त्यांचे केटा गाडीने 8,00,000रू व वेळेवर आवश्यक पडल्यास वाढवुन देण्यासाठी 2,00,000 रू असे एकुन 10,00,000/- घेवून आरोपीने सांगितलेप्रमाणे जाम चौरस्ता येथे आले. तेथे चहाचे टपरीवर फिर्यादी व आरोपी भेटले. तेव्हा फिर्यादीने आरोपीस नगदी 10,00,000 रु. देवून आरोपीकडून सोन्या सारखा दिसत असलेला हार घेतला व चंद्रपूर करीता परत निघाले. त्यानंतर फिर्यादीने गाडीमध्ये हाराची पाहणी केली असता, तो सोन्यासारखा दिसणारा नकली बनावटी असल्याचे लक्षात आले. त्यावरून त्यांची फसवणुक झाल्याचे त्यांना समजुन आल्याने घडलेल्या घटनेची रिपोर्ट देण्यास पो.स्टे. ला हजर आले. फिर्यादीचे रिपोर्टवरून पो. स्टे. समुद्रपूर येथे अप क. 703/23 कलम 420, 34 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कार्यवाही मा. पोलिस अधिकक्षक वर्धा श्री. नुरूल हसन मा. अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगनघाट श्री रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात ठानेदार एस. बी. शेगावकर यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी अनिल देरकर, पंकज मेश्राम, सफौ विक्की मस्के डी.बी पथक पोहवा अरविंद येणुरकर, नापोशि रवि पुरोहित नापोशी / सचिन भारशंकर, नापोशी / राजेश शेंडे व पोशि वैभव चरडे समुद्रपुर हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!