सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची नुकसान भरपाई द्या.
युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली तहसीलदारांना मागणी.
देवळी : गेल्या महिन्याभरापासुन देवळी तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून परिपक्व अवस्थेत असताना सोयाबीन पीक अचानक पिवळे पडून पूर्णतः उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांसमोर प्रचंड मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
संततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी जमा होऊन सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.
कृषी विभागाने शिफारस केलेल्या व शेतकऱ्यांना अनुदानावर वाटप करण्यात आलेल्या फुले संगम व फुले किमया या सोयाबीनच्या वाणावर या रोगाचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
यावर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपनामुळे आधी पावसाचा खंड व त्यानंतर दुबारपेरणीचे संकट त्यातून शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचविले तर आता अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकावर आलेला हा बुरशीजन्य रोग यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच मदत न केल्यास कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे.
यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी अचानक पिवळे पडलेले सोयाबीनचे झाडे आणून आज तहसीलदार श्री जाधव साहेब व कृषी विभागाचे अधिकारी श्री उगवेकर आणि श्री. बुट्टे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार्ड चे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. यावेळी चर्चे दरम्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर रोष व्यक्त केला व हेतुपुरस्सर काही शेतकऱ्यांना पिक विम्यातून वगळण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले व सरसकट सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्यातून नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली अन्यथा कृषी विभाग व विमा कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त करत पुढील काळात मोठे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला यावेळी देण्यात आला.
यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे समीर सारजे, संदीप दिघीकर, स्वप्नील मदनकर, लोमेश बाळबुधे, मनोज नागपुरे, प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर, अविनाश धुर्वे, अमोल भोयर, विनय महाजन, दिलीप बाळबुधे, आशिष जावंधिया,देविदास मेंढे, संजय कुर्जेकार,वृषभ गावंडे, राहुल सारजे, गजानन नागतोडे, भिमराव फुलमाळी, अजय पांडे, प्रदीप खैरकार, विनोद पवार, सुरज डुकरे, प्रणित हुसनापुरे, ज्योत्स्ना राऊत, सुनीता अलोने, दिलीप बिजवार व इतर शेकडो शेतकरी उपस्थित होते.
सागर झोरे सहासिक न्यूज-24