सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यासाठी प्रयत्न करणार,:पालकमंत्री ना. मुनगंटीवार.

0

जाम येथे आमदार कुणावार व हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्याच्या वतीने पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचा भव्य सत्कार…

हिंगणघाट : १७ ऑक्टोंबर रोजी जिल्हातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत तसेच सिंचनासाठी १२ तास विद्युत पुरवठा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जाम चौरस्त्यावर आ. समिर कुणावार तसेच भाजपा कार्यकर्त्यांचेवतीने आयोजित स्वागत समारंभाचेवेळी नवनियुक्त पालकमंत्री ना. सुधिर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर आमदार समिर कुणावार,भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे,विधानसभा प्रभारी संजय डेहने आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार समिर कुणावार यांनी पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्यासमोर विधानसभा क्षेत्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पिवळा मोझ्याक तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संबंधी माहिती देऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.यावेळी समुद्रपुर तालुक्यात ३ वाघांचा मुक्त संचार असल्याने येथील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकाच्या ओलितासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतो आहे.
यामुळे शेतकऱ्यांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यासाठी मागणी केली.
शासनाकडून प्रास्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट येथे मंजूर करण्यात यावे अशी सुध्दा मागणी आमदार समिर कुणावार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
याप्रसंगी पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी सकारात्मकता दाखवित या तिन्ही मागण्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
ना.सुधिर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथून वर्धा येथे जात असताना जाम चौरस्त्यावर आ. समिर कुणावार यांच्यावतीने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे,अंकुश ठाकुर,आकाश पोहाणे,उमेश तुळसकर, प्रा.मेघश्याम ढाकरे,
तालुकाध्यक्ष वामन चंदनखेडे, समुद्रपुर मंडळ अध्यक्ष गजानन राऊत,माजी उपसभापती योगेश फुसे,सामाजिक कार्यकर्ते राजा मॅडमवार, समीक्षा मांडवकर,माजी नगराध्यक्ष शीला सोनारे,वर्षा बाभूळकर ,मोनिका बेलेकर,विकि बारेकर शेषराव तुळणकर ,अंकूश खुरपडे राम काळे, सरपंच विलास नवघरे,राजु नौकरकर, मुर्लिधर चौधरी, जगदीश वरटकर आदिंसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24 हिंघणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!