सोयाबीन नुकसानीचा पंचनामा शेतकऱ्याच्या बांधावर.
देवळी : शेतकरी सोयाबीन नापिकीमुळे त्रस्त आहे त्यांचा लागवड खर्चही निघेल ही त्यांनी आशाच नाही, एकरी दोन पोते या तीन पोते एक पोते असे उत्पादन आहे त्यामुळे लागवड खर्च ही निघालेला नाही असे शेतकरी सांगतात.तसेच सरकारी योजनेतून त्यांना कोणत्याही योजनेतून लाभ मिळालेला नाही.पीकविमा योजने अंतर्गत वेगवेगळ्या परिसरातील शेतपाहणी सुरु आहे.जेणेकरून या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा असे शेतकऱ्यांची मागणी आहे.
याची शहाणीषा करण्यासाठी देवळी तालुक्यातील १६ ऑक्टोंबर रोजी शासनाच्या आदेशानुसार सोयाबीन पिकाची पाहणी करण्याकरिता देवळी तहसील कार्यालय अंतर्गत नायब तहसीलदार शकुंतला पाराजे, तलाठी कैलास बुढ़घे यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी करून आढावा घेतला हा आढावा शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच सोयाबीन पिकाची नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.तसेच ज्या शेतकऱ्यानी पिकाची ई पिक नोंदनी केली नाही त्या शेतकऱ्यानी सोयाबीन पिकाची लागवडीची नोंद देवळी तहसील कार्यालय कडे त्वरित तलाठीकडे करावी अशी सुचना नायब तहसीलदार शकुंतला पराजे यांनी शेतकऱ्यांना केली.यावेळी शेतकरी सुरेश वैद्य,विलास कांमडी,सुभाष जयपुरकर,निशांत कांमडी,जब्बार तव्वर,अतुल कामड़ी,शशांक वैद्य,व इतर शेतकरी प्रमुखयाने उपस्थित होते.
सागर झोरे सहासिक न्यूज -24 देवळी