स्टेट बँक अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त
Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी /देवळी:
स्थानिक स्टेट बँक अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे स्टेट बँकेतील ग्राहक त्रस्त झालेले आहे.काहींनी याविषयी शाखा प्रबंधक अधिकाऱ्याला बँकेत सुरू असलेल्या अपमानास्पद वागणूकिची मिळत असल्याची तोंडी तक्रार केली परंतु शाखा प्रबंधकणे याकडे दुर्लक्ष केले. स्टेट बँकेतील एक महिला अधिकारी बँकेत येणाऱ्या वयोवृद्ध ग्राहकांना खालच्या दर्जाची वागणूक देत आहे.स्टेट बँकेतील पासबुकची प्रिंटर मशीन मागिल कित्येक दिवसापासून बंद होती तसेच एटीएम मशीन मध्ये सुद्धा कधी रोख रक्कम असते तर कधी नसते केव्हा एटीएम मशीन चालू किंवा बंद असते याची वेळ निश्चित नाही स्टेट बँकेत येणाऱ्या ग्राहकांना पैसे भरावयाचे असल्यास त्यांना जी सी सी मशीन द्वारे पैसे भरावे अशी सक्ती बँकेतील ती महिला अधिकारी करते जाणीवपूर्वक डिपॉझिट स्लीप देत नाही तुम्ही जी सी सी मशीनचा च उपयोग करा अशी ती वारंवार सांगत असते परंतु जी सी सी मशीन चा उपयोग करावा कसा येणारे वृद्ध पेन्शन धारक शेतकरी मजूर वर्ग यांना ते कळत नाही त्यामुळे त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि आणि जर जी सी सी मशीनचा उपयोग केला तर त्यासाठी अतिरिक्त पैसे ग्राहकाला द्यावे लागतात.आता पावसाळ्यामध्ये शेतकरी स्टेट बँक मध्ये शेती कामासाठी लागणाऱ्या पीक कर्जासाठी चकरा मारत आहे त्यांनाही अनेक वेळा अरेरावीची भाषा त्या महिला अधिकाऱ्याकडून बोलल्या जाते परंतु आज पर्यंत त्या महिला अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न स्टेट बँकेत येणारे ग्राहक विचारत आहे.शासनाने देवळी स्टेट बँक शाखेमध्ये सुरु असलेले ग्राहकांच्या अपमानास्पद वागणूकिची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देवळी शहरातून होत आहे.