हमदापूर सर्कल मधील तीन गावातील शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा संपर्क तुटला,

0

शेतात जाणाऱ्या नाल्यावरील पूल गेला वाहून.

नाल्याच्या पुलावरून ढोले टाकून शेतात जाण्यास तात्काळ रस्त्या द्या ..

अन्यथा नाल्यावर बसुन आंदोलन करणार – अतूल वांदीले यांचा आंदोलनाचा इशारा….

– नाल्याचा पूल गेला वाहून… शेतकऱ्यांना शेतात जाता येईना..

अधिकाऱ्यांशी केला संपर्क अधिकारी म्हणतात डोंग्यांनी जा.. शेतकऱ्यांची तहसीलदारा कडून थट्टा…

ईकबाल पहेलवान
सहासिक न्यूज-24

हिंगणघाट: विधानसभा मतदारसंघातील हमदापुर सर्कल मधील पहलानपुर गावातील नाल्याचा पूल नाला खोलीकरण दरम्यान कंत्राकदाराने तोडला असल्याने आजूबाजूच्या तीन गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्या येण्यासाठी रस्ताच उरला नाही…. पैहलानपूर, शिवणगाव व चिंचोली या तीन गावातील शेतकऱ्यांच्या शेत्या या नाल्याच्या पार असून या नाल्या वरती असलेल्या पुलावरून शेतकरी आपल्या शेतात जाणे येणे करत होते.. या नाल्याचं खोलीकरण करत असताना नाल्यावरील सर्व ढोले कंत्रांत दाराने काढून टाकले… नाल्याचं काम पुर्ण झाल्यानंतर हे ढोले टाकून रस्ता पूर्व करून देण्याच काम संबंधित कंत्राटदाराचे होते.. मात्र या कंत्राटदाराकडून या नाल्यावरील पुल न टाकता रस्ताच ठेवण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांची मोठी फजिती झाली आहे..
शेतकऱ्यांनी या बाबत तक्रार करण्यासाठी म्हणून सेलु येथील तहसीलदारांणा गाठले.. तहसीलदारांनी शेतकऱ्यांची थट्टा करत छोट्याशा नाल्यातील पाण्यात डोंगा टाकून शेती करावी असा सल्लाच देऊन दिला.आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी या शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून आठ दिवसाच्या आत या नाल्यावर ढोले टाकून शेतकऱ्यांची शेतात जाण्याची व्यवस्था न करून दिल्यास याच नाल्याच्या पाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून आता पहिलानपूर या गावातील शेतकऱ्यांना न्याय अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!