हिंगणघाट ग्रामीण रुग्णालयाचा डोळ्याचा नेत्रतज्ञ डॉ.संजय बोबडे शासकीय काम सोडून पत्नी सोबत ‘परिणाम हेल्थ केअर’ च्या इशार्‍यावर हॉटेल गणराज मध्ये करतात डान्स

0

साहसिक वृत्त /
नागपूर/वर्धा (विशेष प्रतिनिधी):
भारतात कमी दिवसात झटपट करोडपती बनण्याचे स्वप्न सर्वच जण पाहायला लागले आहे. त्यातील ८० टक्के लोक हे आजही इमानदारीने मेहनत करुन आपला संसार चालवितात. परंतू २० टक्के लोक कोणताही कामधंदा न करता लोकांना उल्लू (टोपी) देवून आपले जिवनमान उंचविण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार सध्या भ्रष्टाचार मलिन झालेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस यांचे कार्यकाळात सुरु आहे. एखाद्या औषध विक्रेत्याला बी.फार्म, डी, फार्म ची पदवी असल्याशिवाय मेडिकल चालविण्याची परवानगी मिळत नाही. परंतू हिंगणघाट ग्रामीण रुग्णालयाचा नेत्रतज्ञ असलेला डॉ.संजय बोबडे नावाचा शासकीय कर्मचारी याने नकली डॉक्टर बनून परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. कंपनीची औषधी विकण्याचा गोरखधंदा वर्धा येथील हॉटेल गणराज मधून सुरु केला आहे.
हिंगणघाट ग्रामीण रुग्णालय येथील नेत्रतज्ञ डॉ.बोबडे हा जिल्हा शल्यचिकित्सक तडस यांना दरमहा लाखो रुपयाची लाच देत असल्याची कबुली परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. मध्ये काम करणार्‍या एजंट यांनी दिली आहे. परिणाम हेल्थ केअर या कंपनीचे हेड ऑफिस छपरा नगर, आंबेडकर गार्डन नागपूरच्या मागे आहे. या ऑफिसला कोणत्याही प्रकारचा बोर्ड नाही. एका भाड्याच्या घरातून मागील ४ वर्षापासून हा गोरखधंदा सुरु आहे. परिणाम हेल्थ केअर कंपनी ही नेटवर्क मार्वेâटिंग करतात. ती औषधी रुग्णांना फायदेशिर आहे किंवा नाही, याची शहानिशा न करताच मागील ४ वर्षापासून पंजाब येथील अमनसिंह व त्याचा भाऊ हा धंदा १० राज्यात व २०० जिल्ह्यात सुरु असल्याचा दावा ब्राव्हचर छापून करीत आहे. कंपनी जवळ स्वत:चे प्रोफाईल नाही. कंपनीजवळ नेटवर्क मार्केटिंग प्रमाणपत्र नाही. कोट्यावधी रुपयाची औषधी विकणारी कंपनी व्हॅट, जीएसटी, टि.डी. एस., आयकर भरत नाही.
नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांना एका ठिकाणी गोळा करुन जो व्यक्ती नेटवर्क मध्ये परिणाम हेल्थ केअर कंपनीचे औषधी विकणार त्याला विदेशी यात्रा, कार, बंगला व नगदी रक्कम मिळवून देण्याचे आमिष देतात. हिंगणघाट ग्रामीण रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉ.बोबडे हा कंपनीचा एजंट बनू शकत नाही म्हणून या बोबडे नी स्वत:ची पत्नी हिला या परिणाम हेल्थ केअर प्रा. लि. ची एजंट बनविली. आणि बायकोच्या माध्यमातून हा बोबडे नकली डॉक्टर बनला आहे. नेटवर्किंग कार्यक्रमात येणार्‍या रुग्णाची हा तपासणी करतो आणि तूमच्या शरीरात कोणती औषधी फायदेशिर ठरते, त्या हिशोबानी परिणाम हेल्थ केअर कंपनीची नकली औषधी ग्राहकांच्या माथी मारतो. या डॉक्टर बोबडे ला डोळे तपासणीचा अनुभव अतसांना हा परिणाम हेल्थ मार्केटिंगमध्ये येणार्‍या नेटवर्क मार्केटिंग ग्राहक एंजट यांच्या संपुर्ण शरीराची तपासणी करतो. मार्केट मध्ये २०० रुपयाची औषधी ही १२०० रुपयात नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून ग्राहकांचे माथी मारल्या जाते. नेत्रतज्ञ डॉ. बोबडे याने शासनाच्या कामात असणार्‍या नर्सेस, जि.प. चे कर्मचारी यांना या धंद्यात उतरविले आहे. कोणतेही बिलबुक नाही, पावती दिल्या जात नाही. या गोरखधंद्याला जिल्ह्यातील अन्न व औषधी प्रशासन चे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे.
(क्रमश:)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!