हिंगणघाट पोलिसांनी जीव धोक्यात टाकून इराणी टोळीच्या आरोपीला केले जेरबंद

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
हिंगणघाट पोलिसांनी लुटमार करणाऱ्या ‘इराणी’ टोळीच्या एका सदस्याला नाकाबंदी करून अटक केली आहे. मोहम्मद अली गुलाम हुसेन रा. लाजपत नगर दिल्ली वय ४६ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये ही टोळी फिरत असून गॅस एजन्सी व पेट्रोल पंप असे ठिकाण या चोरट्यांनी टार्गेट केलेले आहे. हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे अशोक सुपारे यांच्या गॅस एजन्सी मध्ये हा चोरटा विदेशी डॉलर दाखवत इंग्रजी भाषेत बोलून फसवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हिंगणघाट पोलिसांनी याबाबत सर्वत्र माहिती दिली असल्याने गॅस एजन्सी मध्ये सतर्कता होती. हा इराणी चोरटा गॅस एजन्सी मधून निघतात गॅस एजन्सीच्या संचालकाने याबाबत पोलिसांना माहिती देत गाडी क्रमांक दिला. के. ए. ०२ एम के ०७४४ अशा क्रमांकाची गाडी घेऊन हा चोरटा धोत्रा मार्गे हिंगणघाट कडे निघाला. हिंगणघाट येथील वना नदीच्या पुलासमोर हिंगणघाट गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे आपल्या चमूनसह नाकाबंदी करून हजर होते. त्यांच्यासोबत हिंगणघाट येथील वाहतूक शाखेचे नितीन राजपूत व अझहर शेख देखील या चोरट्याच्या मार्गावर होते. हिंगणघाट येथील वना नदीच्या पुलावर या चोरट्याला सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या वाहनावर वाहन चढवण्याचा प्रयत्न देखील या इराणी चोरट्या केला. मात्र हिंगणघाट पोलिसांनी आपल्या जीवाची परवा न करता चोरट्यास ताब्यात घेतले. व पोलीस ठाण्यात आणून त्या चोट्यावर कारवाई करून आज न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपीस १० ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या इराणी चोरट्याकडून अनेक मोठ मोठी गून्हे उघडं होण्याची शक्यता आहे . ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम , हिंगणघाट येथील पोलीस निरीक्षक फुंडकर यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे ,निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे ,सचिन भारशंकर ,विशाल बंगाले, यांनी केली. वाहतूक शाखेचे नितीन राजपूत अझर खान यांनी देखील आरोपीला पकडण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटणकर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!