हिंगणघाट पोलिसांनी मोहाता मिल चोरीचा छडा; तीन चोरट्यांना केले अटक
साहसिक न्युज 24
हिंगणघाट/ प्रतिनिधी:
स्थानिक मोहता इंडस्ट्रीज येथिल येथील वर्कशॉपमधे दुरुस्तीसाठी ठेवलेल्या सुमारे ८५ हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीप्रकरणाचा पोलिसांनी उलगड़ा केला असून चोरीप्रकरणी शहरातील इंदिरा गांधी वार्ड येथील तीन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
चोरटयांनी चोरी करतांना वापर केलेला ऑटो तसेच मोपेड गाडी यासह चोरी केलेल्या मोटारी भंगारात विकुन मिळालेल्या नगदी रक्कमेसह एकूण ७९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला,
काही दिवसांपुर्वी अज्ञात चोरट्यांनी स्थानिक मोहता मिल कंपनी परिसरातून एकूण २२ इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेल्याची तक्रार मोहता इंडस्ट्रीजचे संचालक प्रविण हरणे यांनी हिंगणघाट पोलिसांत दिली होती.त्यावरून पोलिसांनी कलम ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद तपास सुरू केला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात स्थानिक इंदिरा गांधी वार्ड येथे राहणारे आरोपी संदिप पुरुषोत्तम हेडावू(४२) धिरज फकिरा गिरटकर (३४) सागर उर्फ झिंगा अरुण चांदेकर(२७) या तिन आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली.
आरोपींपासून गुन्ह्यात वापरलेला तिन चाकी ऑटो किंमत ६० हजार रुपये व एक मोपेड गाडी किंमत १५ हजार रुपये तसेच चोरी केलेल्या मोटारी भंगारात विकून मिळविलेले नगदी ४ हजार ९२० रुपये असा एकुन ७९ हजार ९२० रुपयाचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुमेध आगलावे, नायक पोलिस अंमलदार समीर गावंडे,अजर खान,विवेक वाकडे, अमोल तिजारे,संदिप ऊईके यांनी केली.