हिंगणघाट मधील ‘त्या’ दुय्यम निबंधकांची उचलबांगडी करा; नागरिकांनी दिले आमदार कुणावार यांना निवेदन

0

By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ हिंगणघाट:
शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील
प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी नितिन गजभिये यांचे कार्यप्रणालीमुळे जनता संतप्त झाली असून होणाऱ्या त्रासाबाबत थेट महसुलमंत्र्याकडे तक्रार करण्यात आली. संतप्त नागरिकांनी या भ्रष्ट व नियमबाह्य कामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणीसुद्धा आमदार समिर कुणावार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली.हिंगणघाट तालुक्यातील खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी शेतकऱ्यांपासून तर व्यापारी,कर्मचाऱ्यांसह सर्वच नागरिकांना येथे यावे लागते, मागील काही महिन्यापासून प्रभारी सह. दुय्यम निबंधक म्हणून नितिन गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु येथे येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास देण्यात येत, कागदपत्रे बरोबर असुन सुद्धा लवकर काम करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात येते .सदर अधिकारी कार्यालयात वेळी अवेळी येतात,त्यामुळे नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. कामासाठी येणाऱ्या नागरिकांना उद्धट भाषेत बोलत असल्याचेही नागरिकांची ओरड आहे.
अनेकांशी त्या अधिकाऱ्यांचा वाद निर्माण होऊन प्रकारण हातापायीवर आल्याची माहिती आहे.
संतप्त नागरिकांनी या प्रभारी निबंधकाची उचलबांगड़ी करण्यासाठी थेट आमदार समिर कुणावार यांचे मार्फत महसुल मंत्री तसेच विभागाचे नोंदणी महानिरीक्षक यांचेकडे तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!